पुढारी ऑनलाईन
प्रभास आणि दीपिका पदुकोन सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासने दीपिकाला विशेष मेजवानी देत हैदराबादचे स्पेशल पदार्थ खाऊ घातले होते. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सेकंड शेड्युलला सुरुवात होत आहे. याच आठवड्यात हैदराबादमध्ये हे शूटिंग सुरू होणार आहे. या शेड्युलमध्ये काही महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रिकरण या दोघांवर होणार आहे. हा एक सायफाय चित्रपट असून यात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे. ते देखील या शेड्युलमध्ये चित्रिकरणात सहभागी होऊ शकतात.
नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रभासने 200 दिवसांचा वेळ दिला आहे. 'बाहुबली'पासून प्रभास आजकाल जे काही करतो ते सर्व भव्य दिव्यच करतो. त्याचा 'साहो' तितका चालला नसला तरी त्याचे बजेट आणि त्याची कमाईही मोठीच होती. याशिवाय त्याचा 'राधेश्याम' ही बिगबजेट आहे. आगामी काळात 'आदिपुरुष' आणि 'सालार' हे देखील बिगबजेट चित्रपट आहेत. त्यामुळे प्रभासचे सध्या उत्तम सुरू आहे.