पुढारी ऑनलाईन : करिना कपूरच्या दोन्ही प्रेग्नेंसी चर्चेत राहिल्या आहेत. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत इतर अभिनेत्रींच्या तुलनेत करिनाच्या प्रेग्नेंसीची पुष्कळ चर्चा झाली. तैमूरच्या जन्मावेळी असो वा जहांगीर, या दोन्ही मुलांच्या जन्माच्या आधीपासून करिना चर्चेत होती. तिचं प्रेग्नेंसीदरम्यानचं वाढलेलं वजन असो वा त्याकाळातील आहार; किंवा तिचा त्या काळातील व्यायाम असो वा फोटोशूट, सगळचं कसं अलबेल!
तिच्या आयुष्यातील खास करून प्रेग्नेसी काळातील सर्व गोष्टी तिने सार्वजनिक केल्या होत्या.
लपवण्यासारखं काहीचं नाही, असे म्हणत तिने बिनधास्त 'त्या' काळातील 'सेक्स'वरदेखील भाष्य केलं.
आज २१ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस. तिच्या दोन्ही प्रेग्नेंसी काळातील गोष्टी आणि तिला मिळालेलं ग्लॅमर हे कौतुकास्पद आहे. कारण, दोन प्रसुतीनंतरही स्वत:ला फिट ठेवणारी ती केवळ बॉलीवूडची 'बेबो'चं असू शकते!
तिचं सर्वात मोठं धाडस म्हणजे तिने कुणाचाही विचार न करता थेच आपल्या वयापेक्षा तब्बल ११ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या सैफ अली खानशी लग्न केल. तेव्हा ती ट्रोल देखील झाली. पण, ट्रोलर्सच्या टोमण्यांचा खरा त्रास सैफला सहन करावा लागला होता. कारण, त्याची सारा अली खान आणि इब्राहिम अली खानसारखी त्याच्या पहिल्या बायकोची मुले चक्क लग्नाला आली आहेत. आणि दुसरीकडे, त्याने बेबोशी थेट लग्न केलं होतं. असो.
बेबो आधीपासूनचं ग्लॅमरस आहे. पण, तिने आपली प्रेग्नेंसीलादेखील ग्लॅमर मिळवून दिले आहे.
कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती एका जाहिरातीसाठी हे फोटोशूट करताना दिसली होती. करीना सोफ्यावर बसलेली दिसत होती. या जाहिरातीत ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. प्रेग्नेंसीच्या काळातदेखील तिने आपल्या कामात सातत्य ठेवलं होतं.
ती म्हणायची, प्रेग्नेंसीच्या काळात तिने प्रेग्नेंसी इन्जॉय केली. इतकचं नाही तर तिने प्रेग्नेंसीदरम्यान, खूप कामदेखील केलं. प्रेग्नेंसी दरम्यान कामे केल्याने बाळ हेल्दी राहतं, असं ती म्हणायची.
डिलिव्हरी होण्याआधी देखील ती आपल्या प्रोजेक्टवर काम करताना दिसायची.
जाहिरात शूट करणे, हा तिच्या कामाचाचं एक भाग होता. प्रेग्नेंसीवेळी प्रत्येक महिलेला काम करायला हवं. त्यामुळे स्ट्रेस दूर होतो. असं म्हणत तिने काम करून फिटनेस लेव्हलवर एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर मांडलं.
प्रेग्नेंसीवर आधारित पुस्तक 'करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल' तिने लॉन्च केलं. तिने लॉन्च केलेल्या पुस्तकाला ग्लॅमर मिळालं. कारण, जे खुलासे तिने या पुस्तकातून केले होते. ते अन्य कुठलीही स्टार तितक्या ताकदीने कदाचित बोलू शकली नसती.
इन्स्टाग्रामवर एका लाईव्ह सेशनमध्ये तिने बुक लॉन्च केलं. आणि करण जोहरशी पुस्तकासंदर्भात चर्चा केली होती.
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर बेबोने तिच्या प्रेग्नेंसी काळातील अनेक गुपिते एका कार्यक्रमात उघड केली होती. तेथे तिने प्रेग्नेंसी काळात शरीरसंबंध ठेवले नसल्याचे स्पष्ट केले होते. ज्या विषयावर बोलण्यास महिला कचरतात. तेथे मात्र बेबोने उघडपणे त्या काळात शरीरसंबंध ठेवले नसल्याचे म्हटले.
प्रेग्नेंसीवेळी तिने खुलासा केला होता की- ती प्रेग्नेंसी दरम्यान, सेक्सपासून दूर राहायची. ही गोष्ट सैफ समजू शकत होता. तो या गोष्टींना पाठिंबा द्यायचा.
याविषयावर बोलताना ती म्हणाली होती- त्या काळात एका महिलेच्या फिलिंग्स कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी होते. यावर अवलंबून असतं की, ती कसा अनुभव घेते. जर तुमचा नवरा तुम्हाला समजू शकत नाही. त्याला त्या गोष्टी हव्याचं असतात. तर तो तुमच्या मुलाचा उत्तम बाबा कसा होऊ शकतो?
महिन्या महिन्याला वाढत्या पोटासोबत स्वत: हॉट समजण्याची क्षमता तिने धरून ठेवली होती. ती म्हणायची – लोकांना वाटतं…जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता…तेव्हा त्यांना अनुभव नसतो की, तुमचा मूड, इमोशन्स, फिलिंग्स काय आहेत. हे खूप महत्त्वपूर्ण आहे.
काही दिवसांनी मला वाटत होतं की, मी खूप शानदार आणि हॉट दिसत आहे. मला वाटायचं की, मी खूप हॉट दिसत आहे या पोटासोबत.
प्रेग्नेंसीचा अर्थ असा नाही की, तुम्ही पूर्ण दिवस घरी बसून राहा. काही काम करू नये. निष्क्रिय होण्याऐवजी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन करा. असे म्हणत तिने योगासने आणि व्यायामाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. तिला साथ द्यायला होता सैफ. तिने प्रेग्नेंसीवेळी चित्रपटाचे शूटिंगदेखील केले. जाहिरातीही केल्या.
तैमूरच्या जन्मानंतर ५० दिवसांच्या आत तिने पुन्हा वर्कआउट करणं सुरू केलं होतं. या सर्व गोष्टी त्या-त्यावेळी तिने व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून उघड केल्या. माध्यमांनीही त्या सर्वांसमोर आणल्या.
सेलिब्रिटी काय खात असतील? ज्यामुळे त्यांचा फिटनेस इतका टिकून असतो. असा प्रश्न तुम्हाला नक्कीचं पडत असावा. खरंतरं, सेलिब्रिटीचं व्यायामासोबत प्रॉपर डाएट प्लॅन असतं. तिने तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात कोणतं डाएट फॉलो केलं होतं, हे तिने स्वत: सांगितलं होतं.
करिना म्हणते, तिला तूप खूप आवडतं. प्रेग्नेंसीवेळी तिने खूप सारं तूप खाल्लं होतं. तैमूरच्या जन्मावेळी तिला आवडणाऱ्या गोष्टी तिला खाव्याशा वाटल्या नाहीत. पण, जे काही खाल्लं ते योग्य वेळेत आणि योग्य क्वॉन्टिटीमध्ये खाल्लं.
दोडका, कारलं, दुदी भोपळा यासारख्या खूप साऱ्या भाज्याचा समावेश तिने आहारात केला हाेता. सकाळच्या नाष्ताही तिने कधी चुकवला नाही.
तिने आपली दिनचर्याही सर्वांना शेअर केली होती. ती म्हणते, 'मला सकाळी उठताचं खायला हवं असतं. जर मला जेवण नाही मिळालं तर माझा मेंदू काम करणं बंद होतं. वर्कआऊटच्या आधी मी पोहे, अंडे आणि टोस्ट किंवा ओवा पराठा नाष्तामध्ये खायची.
बेबो म्हणते, प्रेग्नेंसीवेळी तिच्या चेहऱ्यावर जो ग्लो येत होता. त्याचं सर्वात मोठं कारण आहे, लवकर उठणे. मी रात्री १० वाजता झोपायचे. सकाळी ७ वाजता उठायचे.
प्रसूतीआधी करिनाला गिफ्ट मिळाले होते. तिच्या घरी फॅन्स पिंक आणि ब्लू रंगाची पॅकिंग असणारे गुडीज पाठवत आहेत. करीनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर काही फोटो शेअरदेखील केले होते. मॅटर्निटी काळातील तिच्या अगदी छोट्या -छोट्या गोष्टीदेखील सार्वजनिक झाल्या होत्या.
अगदी प्रेग्नेंट राहिल्यापासून तिच्या खाणं, सौंदर्य, व्यायाम, आहार, झाेप, कामे, शूटिंग आणि बरचं काही गोष्टींना ग्लॅमर मिळालं होतं. अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत तिचा प्रेग्नेंसी काळ चांगलाचं रंगला. त्या काळातलं ग्लॅमर म्हणजे काय असतं, हे खऱ्या अर्थानं तिनं ९ महिन्यांच्या काळात जाणवून दिलं.