Kangana-Vinesh| विनेश फोगाटच्या ऐतिहासिक विजयावर कंगना यांची टीकात्मक पोस्ट

कंगना यांनी अभिनंदन तर केले, पण विनेश फोगाटला दाखवला आरसा
Kangana Ranaut-Vinesh Phogat
कंगना यांनी इन्स्टा स्टोरी शेअर करत विनेशवर टीका केलीX account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती ५० किग्रॅ वजनी गट सेमीफायनलमध्ये विनेश फोगाटचा ऐतिहासिक विजयाने भारताचे स्थान आणखी उंच केले. विनेशने क्यूबाच्या युस्नेलिस गुजमॅन लोपेजला हरवून फायनल राऊंडसाठी स्थान निश्चित केले. आता सर्व स्तरातून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. विनेश फोगाटच्या या विजयाने अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत देखील खुश आहेत. पण, एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी विनेशवर निशाणा साधला आहे. (Kangana Ranaut-Vinesh Phogat)

Kangana Ranaut-Vinesh Phogat
'जब वी मेट' अभिनेत्रीच्या तरुण मुलीचे कमी वयातच निधन! जाणून घ्या कारण..
Administrator

विनेशने मंगळवारी एका पाठोपाठ एक बाजी मारून रौप्य पदक निश्चित केलं आहे. आता फायनल जिंकून तिच्याकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. तिने क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुजमॅन लोपेजला ५-० ने मात देऊन संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले. यानंतर कंगना रनौत यांनी जी पोस्ट केली आहे, त्यात काय म्हटलंय पाहुया...

Kangana Ranaut-Vinesh Phogat
Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?

काय म्हणाल्या कंगना रनौत?

कंगना रनौत विनेशच्या विजयाने खुश तर आहेच पण त्यांनी विनेशसहित त्या पैलवानांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे मागील वर्षी जंतरमंतरवर बसून मोदी सरकारविरोधात आंदोलन करत होते. कंगना रनौत यांनी लिहिलं, ‘भारताच्या पहिल्या गोल्ड मेडलसाठी फिंगर्स क्रॉस करून ठेवले आहे. विनेशने आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामध्ये मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली. पण त्यानंतरदेखील तिला ही संधी देण्यात आली की, ती आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करू शकेल आणि बेस्ट ट्रेनिंग, कोच आणि सुविधा मिळू शकतील. हिचं तर लोकशाही आणि एक महान नेत्याचे सौंदर्य आहे.

Kangana Ranaut-Vinesh Phogat
Navri Mile Hitlerla | लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news