'जब वी मेट' अभिनेत्रीच्या तरुण मुलीचे कमी वयातच निधन! जाणून घ्या कारण..

मिहिका ही ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात
Actor Divya Seth Shah s daughter dies
अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका शहा हिचे सोमवारी निधन झाले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका शहा हिचे सोमवारी निधन झाले. दिव्याने मंगळवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मुलीच्या निधनाची बातमी शेअर केली. मिहिका ही ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी मिहिका बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. ताप आणि चक्कर आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावाही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. सध्या तरी कुटुंबीयांनी याचे कारण दिलेले नाही. (Actor Divya Seth Shah s daughter dies)

मिहिकाच्या निधनामुळे शहा कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. फार कमी वयातच मिहिकाने जगाचा निरोप घेतल्यामुळे शहा कुटुंबीय चिंतेत आहे. 8 ऑगस्ट रोजी मिहिकच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती तिची आई दिव्या शेठ शहा यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.

दिव्या शहा यांनी फेसबुकवरील पोस्ट मध्ये म्हटलंय की, ‘अत्यंत दु:खासह आम्ही तुम्हाला आमच्या प्रिय मिहिका शहाच्या निधनाची माहिती देत आहोत. ती 5 ऑगस्ट रोजी आम्हाला सोडून गेली.’ या पोस्टमध्ये दिव्या व तिचे पती सिद्धार्थ शहा नावे आहेत. (Actor Divya Seth Shah s daughter dies)

मिहिकाच्या निधनाची पोस्ट दिव्याने शेअर केल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. काही जण मिहिकाला श्रद्धांजली वाहत आहेत, तर काहींना मिहिकाला नेमके काय झाले होते, याबाबत कमेंट करू विचारले आहे. 29 जुलै रोजीच दिव्याने मुलगी मिहिका आणि आई सुषमा सेठ यांच्याबरोबरचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोत तिघीही आनंदाने पोज देताना दिसत आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मिहिकाच्या निधनाची बातमी आली आहे.

कोण आहेत दिव्या सेठ शहा?

दिव्या सेठ शहा या एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यांची आई सुषमा सेठ याही दिग्गज अभिनेत्री आहेत. दोघींचे शाहरुख खानशी घट्ट नाते आहे. शाहरुखने दिव्याला आपला अभिनय गुरु म्हटले तर सुषमाने किंग खानसोबत कभी खुशी कभी गममध्ये काम केले आहे.

शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावर दिव्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये किंग खाने म्हटले होते की, ‘माझी सर्वात चांगली मैत्रीण दिव्या, जिने मला अभिनय शिकवला... सर्व चांगल्या स्क्रिप्ट तिच्या शिकवणीतून प्रेरित आहेत.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news