Navri Mile Hitlerla | लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार!
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीलाची पहिली मंगळागौर साजरी होणार आहे. येत्या आठवड्यात आपण पाहू शकणार आहात. जहागीरदार घरातील सूना आणि नातसुनांनी जोरात तयारी केली आहे. सगळ्याजणी नऊवारी नेसून आणि दागिने घालून छान तयार झाल्या आहेत. पण या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतचंही सत्य सर्वांसमोर येणार आहे.
लीलाच्या मंगळागौरीत लीलासमोर विक्रांतचं सगळं सत्य समोर येतं आणि हे पुजाला म्हणजेच विक्रांतच्या बायकोला देखील हे सत्य कळतं. ती लीलाची माफी मागते. पण पूजा लीलाकडून विक्रांतसोबत बोलायला थोडा वेळ मागून घेते. इकडे मंगळागौरीत लीला आणि तीन सुनांचं जंगी भांडण होतं. त्यामुळे सरोजिनी आई हा कलह थांबवण्यासाठी लीला आणि एजेला देवदर्शनाला पाठवते. देवदर्शनाला जात असताना किशोर लीलावर हल्ला करतो. लीलाचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे एजेचा जीव कासावीस होतो. एजे लीला घरी आल्यानंतर पुजा आणि विक्रांत लीलाला सगळं सांगण्यासाठी बाहेर बोलवतात. पण एजे विक्रांतला सगळ्यांच्या समोर दोषी ठरवतो आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो.
लीलाची खात्री झालेय की, एजे निर्दोष आहे आणि तिचं चुकलं आहे. अपमानाने खवळलेला विक्रांत, पुजा आणि लीलाला मारायचं ठरवतो. लीलाचा जीव पुन्हा धोक्यात आहे. यावेळीही एजे वेळेत पोहोचून लीलाचा जीव वाचवू शकेल का? कशी साजरी होईल लीलाची पहिली मंगळागौर. ड्रामाने भरलेला 'नवरी मिळे हिटलरला' चा आठवडा रोज रात्री १० वा. फक्त झी मराठीवर पाहता येईल.

