Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?

मिर्झापूर ३ ची नवी अपडेट समोर, बोनस एपिसोड येतोय
Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिर्झापूर ३ ही सीरीज ५ जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाली. परंतु ती प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी ठरली नाही. म्हणूनच निर्मात्यांनी त्याचा बोनस एपिसोड जाहीर केला आहे. त्यामुळे मुन्ना भैय्या एंट्री करू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांनी केला आहे. मुन्ना भैया या नव्या एपिसोडमध्ये दिसणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. (Mirzapur 3)

Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?
Navri Mile Hitlerla | लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार!

या सीरीजला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना, या मालिकेत दिव्येंदू शर्माचे पात्र मुन्ना भैया नसल्यामुळेही चाहत्यांची निराशा झाली आहे. रिपोर्टनुसार, आता त्याची भरपाई करण्यासाठी निर्मात्यांनी एक नवीन युक्ती आणलीय. Amazon Prime Video ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मालिकेत गुड्डू भैयाची भूमिका साकारणारा अली फजल बोनस एपिसोडची घोषणा करत आहे. या बोनस एपिसोडमध्ये काय होईल, मुन्ना भैय्याचे पुनरागमन करणार की नाही, अशी प्रश्ने अनुत्तरित आहेत.

Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?
Yuva Neta Marathi Movie | ‘युवानेता’ यादिवशी होणार प्रदर्शित

मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर

निर्मात्यांनी Amazon Prime च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारणारा अली फजल चाहत्यांसाठी बोनस एपिसोडची घोषणा करतो. तो म्हणतो, 'प्राइम व्हिडिओच्या ऑफिसमधून येऊन डिलीट केलेले सीन काढायला गेलो होतो. या बोनस एपिसोडवर बारकाईने लक्ष ठेवा... या एपिसोडमध्ये एक प्रसिद्ध मुलगाही आहे...त्याला मारणारे आम्हीच होतो. ...ते हटवले...पण तो खूप ईर्ष्यावान आहे...त्याला परत यायचे आहे. प्राइम व्हिडिओवर या महिन्यात येणारा मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड पाहा.

मुन्ना भैय्या शोमध्ये नसल्यामुळे अनेकांनी निराशा व्यक्त केली होती.

Mirzapur 3 | मिर्झापूर ३ चा बोनस एपिसोड जाहीर, येतोय मुन्ना भैय्या?
Satvya Mulichi Satavi Mulgi | त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news