अनुभवा दिव्यत्वाचं दर्शन -ज्ञानेश्वर माउली लवकरचं भेटीला

Dnyaneshwar Mauli
Dnyaneshwar Mauli
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वर माउली यांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे.

भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पसायदानासारखी कलाकृती जगाला दिली. संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.

दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली. दिगपालया मालिकेचं दिग्दर्शनही करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात.

या मालिकेसाठी माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे.

या चरित्रगाथेतून दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे. नक्की पाहा. २७ सप्टेंबरपासून सोम.-शनि., संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news