

पुढारी ऑनलाईन : प्रसिध्द अभिनेता नागार्जुनची सून अभिनेत्री सामंथा सध्या चर्चेत आहे. यामागील कारण आहे-तिचा घटस्फोट. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसोबत तिची घटस्फोटाची चर्चा होतेय. पण, एकीकडे ही चर्चा सुरू असताना मात्र ती ब्रायडल फोटोशूट करण्यात मग्न आहे. सामंथा हिने केलेल्या फोटोशूटवरून सामंथा चर्चेत आहे.
सामंथा अक्किनेनी हिने ब्रायडल लूकमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोंमुळे तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिने लेटेस्ट फोटोशूटमध्ये लाल रंगाची बनारसी साडी नेसली आहे. या लूकमध्ये वधू वेषात दिसत आहे.
ही दाक्षिणात्य चित्रपट अदाकारा सोशल मीडियावर वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतेय. आता पुन्हा एकदा तिचा लेटेस्ट लूक चर्चेत आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून अप्रतिम प्रतिक्रिया मिळत आहेत.
या फोटोजमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये दिसतेय. अक्किनेनीचा हा ब्रायडल लूक तिच्या लग्नाच्या फोटोजची आठवण करून देतो.
तिने अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत २०१७ मध्ये लग्न केले होते. त्यावेळीही तिने लग्नात पारंपरिक क्रीम कलरची सिल्क साडी, मरून ब्लाउज आणि बिंदी घातली होती.
याशिवाय, तिचे वेगवेगल्या लूकमधील फोटो तिच्या इन्स्टावर पाहायला मिळतात.
मागील काही दिवसांमध्ये ही अभिनेत्री आणि तिचा पती नागा चैतन्य अक्किनेनी यांची चर्चा होत आहे. नागा चैतन्य आणि सामंथा यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होतेय.
पण, या चर्चेदरम्यान, या जुलै महिन्यात तिने सोशल मीडिया अकाऊंट्सवरून 'अक्किनेनी' आडनाव हटवले. तेव्हापासून तिचे आणि नागा चैतन्य यांच्यात वाद सुरू असून घटस्फोटाची चर्चा रंगली.
अक्किनेनीने तमिळ आणि तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. ता एक मॉडल आहे. ग्रीकमध्ये तिच्या नावाचा अर्थ आहे-फूल. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी तिला अनेक फिल्मफेयर ॲवॉर्ड मिळाले आहेत.
तिचा जन्म २८ एप्रिल, १९८७ रोजी चेन्नई, तमिळनाडूमध्ये झाला. तिने शालेय शिक्षण 'हॉली एंजल अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल', चेन्नईमधून पूर्ण केले.
पुढे तिने 'स्टेल्ला मॉरिस कॉलेज', चेन्नईतून पदवीचे शिक्षण घेतेले. नंतर तिने पदवीचे शिक्षण घेताना मॉडलिंग केले. मॉडलिंग करताना तिला पहिल्यांदा चित्रपट दिग्दर्शक 'रवि वर्मन'ने पाहिलं होतं.