bbm-विशाल-विकास यांच्यामध्ये पुन्हा एकदा होणार राडा

bbm-विशाल-विकास यांच्यामध्ये पुन्हा एकदा होणार राडा
Published on
Updated on

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालचा दिवस थोडा भावूक होता. जिथे काही खास पाहुणे सदस्यांना भेटायला घरामध्ये गेले. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी रंगल्या. सदस्यांनी थोडी मज्जा मस्ती केली. थोडा राडाही झाला. कारण अत्यंत महत्वपूर्ण असा टास्क त्यांच्यासमोर पार पडला. तो म्हणजे temptation रूममध्ये जाण्याची या सिझनमधील शेवटची सुवर्णसंधी कोणत्या सदस्याला मिळणार. दरम्यान, विशाल-विकास यांच्यामध्ये पुन्हा एकदा राडा होणार आहे. विशाल-विकास यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलीय.

मीरा आणि उत्कर्षने या टास्कमध्ये बाजी मारलीय. हा बहुमान त्यांना मिळणार असे वाटले. बिग बॉस यांनी जाहीर केले ही संधी एकाच सदस्याला मिळणार आहे. त्यामुळे उत्कर्ष temptation रूममध्ये जाणार शेवटचा सदस्य ठरला. ज्याची किंमत मीराला चुकवावी लागली. आज घरामध्ये रंगणार आहे नवा टास्क. बघूया यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोण हारणार?

आजच्या टास्कमध्ये विकास आणि विशालमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त राडा होणार आहे. घरातील समीकरण बदलताना दिसत आहेत. प्रत्येक सदस्य individual गेम खेळणार असे दिसून येत आहे. टास्क असा असणार आहे. तात्या यांच्या स्पेसशिपचे इंधन संपले आहे. प्रत्येक सदस्याला त्यांच्या टीममधील सदस्यांच्या मदतीने स्पेसशिपमध्ये इंधन भरायचे आहे.

यावरूनच विकास-विशाल यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. विकासचे म्हणणे आहे तू डायरेक्ट घुसलासच… विशालचे म्हणणे आहे, त्यांची पाईप लाईन complete झाली गेम ते जिंकले. वाद पुढे वाढतच गेला. बघूया पुढे काय झाले आजच्या भागामध्ये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news