हा आहे Real Life गजनी; ज्याला दर ६ तासांनी काहीच आठवत नाही! | पुढारी

हा आहे Real Life गजनी; ज्याला दर ६ तासांनी काहीच आठवत नाही!

पुढारी ऑनलाईन डेस्क

Real Life गजनी : आमिर खानच्या गाजलेल्या ‘गजनी सिनेमा विषयी तुम्हाला माहित असेलच. गजनी सिनेमात आमिर खानने जी भूमिका केली आहे त्या व्यक्तीला एका घटनेनंतर मेमरी डिसऑर्डरची समस्या निर्माण होते. त्याला काही वेळानंतर पाठीमागील काहीही आठवत नाही. याला शॉर्ट टर्म मेमरी असे म्हटले जाते. अशा व्यक्तींना नुकत्याच घडलेल्या घटनांची आठवण राहते. त्यांना घडलेल्या घटनांची आठवण ठेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशा व्यक्तींची काही सेकंदापासून ते अनेक दिवसांपर्यंत स्मरणशक्ती जाऊ शकते. हे केवळ सिनेमात नाही तर वास्तव जीवनातही पहायला मिळते. जर्मनीतील एका व्यक्तीच्या बाबतीतही असेच घडत आहे. तो व्यक्ती मेमरी लॉसमुळे सध्या चर्चेत आहे.

संबंधित व्यक्तीने ६ वर्षापूर्वी झालेल्या एका दुर्घटनेत आपली स्मरणशक्ती गमावली. आता हा व्यक्ती प्रत्येक ६ तासांनंतर आधीचे सर्व काही विसरुन जातो. त्याच्यासोबत ज्या घटना घडल्या आहेत त्याची माहिती त्याने नोंद करुन ठेवली नाही तर त्याला ६ तासांनंतर काहीच आठवत नाही. ‘six-hour memory’ मुळे हा व्यक्ती चर्चेत असून त्याचे नाव डेनियल श्मिट असे आहे. एका अपघातानंतर ‘six-hour memory’ म्हणून चर्चेत आलेल्या या व्यक्तीच्या संघर्षमय जीवनाला सुरुवात झाली. ज्यावेळी डेनियल आपल्या बहिणीला भेटायला जात होते त्यावेळी त्यांना अपघात झाला. या अपघातातून ते बचावले पण त्यांची स्मरणशक्ती गेली.

बहिणीला भेटायला जाताना घडली दुर्घटना…

डेनियल यांना सहा तासांपूर्वीचे काहीच आठवत नाही. जर त्यांनी एखाद्या कामाची अथवा ठिकाणाची नोंद करुन ठेवली नाही तर ती गोष्ट ६ तासांनंतर त्यांच्या स्मृतीतून जाते. जेव्हा ते आपल्या बहिणीला भेटायला चालले होते त्यावेळी त्यांचा अपघात झाला. हा अपघात ए‍वढा भीषण होता की त्यांना तातडीने उपचारासाठी एयरलिफ्ट करावे लागले होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. या दुर्घटनेनंतर त्यांची स्मरणशक्ती गेली. फिजियोथेरेपी आणि स्पीच थेरेपीच्या मदतीने डेनियल आता हळूहळू यातून बरे होत आहेत. आता त्यांना त्यांच्यासोबत होणाऱ्या घटनांची आठवण ठेवण्यासाठी सोबत एक डायरी ठेवावी लागते.

Real Life गजनी : स्वतःच्या मुलाचा जन्मदेखील आठवत नाही….

काही वर्षापूर्वी डेनियल आणि त्यांच्या पत्नी कॅथरिना यांना मुलगा झाला. पण डेनियल यांना त्यांचा मुलगा कसा मोठा होत आहे हेही आठवत नाही. ते सांगतात की, त्यांच्या मुलाने कधी जन्म घेतला हेदेखील आठवत नाही. याच गोष्टीचे आपल्याला दुःख होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!!

Back to top button