

बॅकबेंचर टॉपरच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांचे प्रेम यशस्वी होण्याची शक्यता जवळपास नसते. मात्र एका बॅकबेंचरचे टॉपरबरोबर लग्न करण्याचं स्वप्न साकार झाले आहे. या बॅकबेंचरने व्हिडिओ शेअर करत आपली लव्हस्टोरी थोडक्यात सांगितली आहे. त्यात शाळेतील ईअर एन्डचा फोटो आहे, त्यात बॅकबेंचर मुलगा शेवटी तर टॉपर मुलगी पहिल्या रांगेत बसलेली दिसत आहे. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे या तरुणाने मुलीशी ओळख वाढवली. हळूहळू दोघे एकमेकांना भेटून डेट करू लागले. काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि लग्नाचा निर्णय घेतला.
लग्नात जेव्हा मुलगी मुलाला हार घालण्यासाठी येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी आनंद अगदी हटके पद्धतीने व्यक्त केला. मुलीने देखील गोड हसून त्याच्या कृतीला दाद दिली आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडिओ chatieandsatie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.