'जय भवानी जय शिवाजी' : चतुरस्त्र भूमिकेत दिसणार अभिनेता स्तवन शिंदे | पुढारी

'जय भवानी जय शिवाजी' : चतुरस्त्र भूमिकेत दिसणार अभिनेता स्तवन शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क

स्वराज्यस्थापनेसाठी आजवर हजारो शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा वीरमरण आलेल्या शिलेदारांचे करावे तितके कौतुक कमीच. याच शिलेदारांच्या शौर्यकथेतील आणि स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाचं पान म्हणजे शिवा काशीद. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळत आहे. हे पात्र अभिनेता स्तवन शिंदे साकारत आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत स्तवनने शिवा काशीदच नव्हे तर आणखी तीन भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केले.

चतुरस्त्र भूमिका साकारत स्तवन या मालिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. शिवा काशीद या मालिकेतील मुख्य भूमिकेसह तो अभिनेते अजिंक्य देव साकारत आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या व्यक्तीरेखेत तो दिसणार आहे. इतकेचं नव्हे तर पन्हाळगडावर असताना पडलेल्या वेढ्याला प्रतिउत्तर देण्यासाठी त्याने शौकीद काशीद नावाची भूमिका या मालिकेत साकारली.

पन्हाळगडावरुन शिवरायांची सुटका करण्यासाठी शिवरायांचे प्रतिबिंब म्हटले जाणाऱ्या शिवा काशीदने शिवरायांचे वेषांतर केले. शत्रूंची दिशाभूल करून राजांचा जीव वाचवणाऱ्या पात्राची जबाबदारीही स्तवनने या मालिकेत उत्तमरीत्या पेलवली. एका महिन्यात चित्रीत झालेल्या या चारही भूमिकांचे प्रसारण मालिकेत सुरू आहे.

या चतुरस्त्र भूमिकांबद्दल बोलताना स्तवन म्हणाला, मालिकेत शिवा काशीद यांच्या मुख्य भूमिकेनंतर मी आणखी तीन भूमिका एकाच वेळी साकारल्या आहेत. खरतरं एकाचवेळी चार भूमिका साकारणं माझ्यासाठी टास्कच होता. मात्र,  दिग्दर्शक टीम, प्रॉडक्शन, इतर कलाकार मंडळी आणि माझा प्रेक्षक वर्ग यांच्या सपोर्टमुळे या भूमिका मी उत्तमरीत्या साकारल्या.

अजिंक्य सरांकडून बरेच काही नव्याने शिकायला मिळाले. या ऐतिहासिक मालिकेत साकारायला मिळालेल्या भूमिका हे माझे भाग्यच समजतो”.

छोट्या पडदयावर हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्तवन या ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. या एकाच मालिकेतील वेगवेगळ्या भूमिका साकारतानाचा स्तवन प्रेक्षकांना पाहणे रंजक ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Stavan Shinde (@stavan_shinde)

 

View this post on Instagram

 

A post shared by Stavan Shinde (@stavan_shinde)

Back to top button