Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट

Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमूळे घराघरात पोहचलेल्या अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. हे लेटेस्ट फोटो तिने  सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग होता. अपूर्वाने (Apurva Nemlekar) नवरात्रीच्या पहिला दिवशी कोल्हापूरची श्री अंबाबाईचे स्‍मरण केले.

श्री अंबाबाई महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.

नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी अपूर्वाने  हिरव्या रंगाची साडी घातली हाेती. या दिवशी तिने मुंबईमधील सहा शतके जुने असलेले  मुंबादेवीचे रुप साकारत देवीला नमन केले.

नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी करडा रंग होता. अपूर्वाने या दिवशी कर्नाटकमधील उडपी येथील जया गौरी दुर्गा परमेश्वरी साकारली.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रंग नारंगी आहे. अपूर्वाने आज सलग चौथ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन देवीला नमन केले.  राशीन देवीला देवी यमाई असेही म्हणतात.

अपूर्वाने हे फोटो सोशल मीडिवर शेअर करत, देवीच्या प्रत्येक रुपाचं माहात्म्यही सांगितले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या संमिश्र कमेंट येत आहेत. अप्रतिम, खूप छान, एवढीच हौस असेल तर तसे फोटोशूट करून घरात लावा. अशा कमेंटही तिला येत आहेत. ट्रोल करणार्‍यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.

अपूर्वा सोशल मीडियावर  सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी नेहमी हटके फोटो शेअर करत असते.  'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील तिची 'शेवंता' ही भूमिका खूप गाजली होती.

हेही वाचलं का?

पहा व्हिडिओ : नवदुर्गा या स्त्रीमध्येच लपलेल्या आहेत : भाग्यश्री मुळे | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत विशेष मुलाखत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news