leave in relationship : हे ३ सेलिब्रेटी 'नग' बायका पोरांना सोडून राहतात गर्लफ्रेंडसोबत ! - पुढारी

leave in relationship : हे ३ सेलिब्रेटी 'नग' बायका पोरांना सोडून राहतात गर्लफ्रेंडसोबत !

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेलेब्स अनेकदा त्यांच्या पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये leave in relationship राहताना दिसतात. आज या यादीमध्ये आम्ही त्या बॉलिवूड सेलेब्सबद्दल सांगणार आहोत, जे आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून मैत्रिणींसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात.

leave in relationship : अर्जुन रामपाल

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि मॉडेल मेहर जेसिया यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. मात्र, हे लग्न 20 वर्षांनंतर तुटले. या लग्नापासून अर्जुनला दोन मुली (माहिका आणि मायरा) आहेत. अर्जुन रामपाल बऱ्याच काळापासून त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रीएड्ससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. एवढेच नाही तर अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रीएड्स यांना एक मुलगाही आहे.

 अरबाज खान

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी लग्नाच्या अनेक वर्षांनंतर घटस्फोट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या लग्नापासून दोघांना एक मुलगा आहे. मलायकापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज खान अनेक दिवसांपासून इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज आणि जॉर्जिया दीर्घ काळापासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. एवढेच नाही तर अरबाजसोबत मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे.

फरहान अख्तर

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने 2016 मध्ये अधुना भबानीपासून घटस्फोट घेतला. फरहान आणि शिबानी यांना या लग्नापासून दोन मुली (शाक्या आणि अकीरा) आहेत. पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर फरहान अख्तर बराच काळ शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचेही अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. फरहान आणि शिबानी अनेक दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. एवढेच नाही तर अधूना एका व्यावसायिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button