Aryan Khan : आर्यनच नव्‍हे, यापूर्वी शाहरुख खानचे कुटुंबच अडकले 'या' वादांमध्‍ये - पुढारी

Aryan Khan : आर्यनच नव्‍हे, यापूर्वी शाहरुख खानचे कुटुंबच अडकले 'या' वादांमध्‍ये

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

एका अलिशान जहाजावरच्या ड्रग्‍ज छाप्यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या ( Aryan Khan ) अटकेने बॉलिवूडला हादरवून सोडले. मात्र ‘एनसीबी’ने स्‍पष्‍टपणे सांगितले आहे की, आर्यन खानजवळ ( Aryan Khan ) ड्रग्‍ज सापडले नाही. मात्र त्‍याचा मित्र अरबाज मर्चेंटजवळ ६ ग्रॅम चरस आढळले होते.

न्यायालयाने शुक्रवारी आर्यन खानची जामीन याचिका फेटाळली. यानंतर आर्यन खान सोबत रेव पार्टीत छापेमारी दरम्‍यान पकडलेल्‍यांना आर्थर रोड सेंट्रल जेल मध्ये पाठवण्यात आले. यानंतर अनेक बॉलिवूड मंडळी ज्‍यामध्ये ॠतिक रोशन , सुझान खान, सोमी अली, फराह खान आणि सुनील शेट्टी सहीत अनेक सेलेब्रेटी शाहरूख खानच्या समर्थनात पुढे आले आहेत. आज आपण शाहरूख खानच्या कुटुंबाशी जोडलेल्‍या वादांवर नजर टाकणार आहोत.

शाहरुख खान (Shah Rukh Khan)

शाहरुख खानला त्‍याच्या मुलांसह २०१२ मध्ये आयपीएल सामन्‍यावेळी वानखेडे स्‍टेडियमवर एका सिक्‍युरिटी गार्डने रोखले होते. यावेळी शाहरुख खानने धक्‍काबुक्‍की  केली. या वर्तनामुळे ताे वादाच्‍या भाेवर्‍यात  सापडला हाेता. तत्‍कालीन मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी शाहरूखवर पाच वर्षांसाठी स्‍टेडियम मध्ये प्रवेश करण्यावर प्रतिबंध लावला होता.

या प्रकरणी मुंबई पाेलिसांनी आपल्‍या तपासात म्‍हटले हाेते की, या घटनेवेळी शाहरूख खान नशेत नव्हता. तसेच धक्‍काबुक्‍की दरम्‍यान अल्पवयीन मुलांसमोर कोणताही अपशब्द वापरला नाही.

अबराम खान (AbRam Khan)

काही वर्षापूर्वी शाहरुख खानचा लहान मुलगा अबरामबद्दल एक नवे प्रकरण समोर आले होते. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, अबराम हा शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानचा लव्ह चाईल्‍ड आहे.

यानंतर शाहरूख खानने एका मुलाखतीत ही निव्वळ अफवा असल्‍याचे म्‍हटले होते. यामुळे आम्‍ही सर्व कुटुंबीय चिंतेत असल्‍याचे त्‍याने म्‍हटले होते. यावर शाहरूख खानने मी आणि माझी पत्‍नी गौरीने चार वर्षापूर्वी तिसरे अपत्‍य जन्माला घालण्याचा निर्णय घेतला होता.

नेटवर दावा करण्यात आला होता की, अबराम हा आर्यन खानचा मुलगा आहे. त्‍यावेळी आर्यन फक्‍त १५ वर्षांचा होता. यावेळी आर्यनचा रोमानियामध्ये कार चालवताना एका मुलीसोबतचा व्हिडिओ समोर आला होता. तो एक फेक व्हिडिओ होता. या प्रकारामुळे आमचे कुटुंब खूप चिंतेत होते, असा खुलासा शाहरुख खान याला करावा लागला हाेता.

गौरी खान (Gauri Khan)

शाहरूख खानची पत्‍नी गौरी खान ही अशाच एका वादात अडकली होती. गौरी खान ही बर्लिन एयरपोर्टवर गांजा सोबत पकडली गेली होती. ती ड्रग्‍जच्या आहारी गेल्‍याचे बोलले जात होते. मात्र गौरीने सर्व अफवा असल्‍याचे म्‍हटले हाेते. यानंतर तिने अशा प्रकारच्या अफवांची काळजी करत नसल्‍याचेही म्‍हटले होते.

सुहाना खान (Suhana Khan)

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा बिकिनी घालून कुटुंबासहीत मजा करतानाचा एक फोटो इंटरनेटवर समोर आला होता. सुहाना त्‍यावेळी फक्‍त १६ वर्षांची होती. मुलीच्या पेहरावावरच्या बातमीने शाहरूख खानला चांगलाच त्रास झाला होता.यानंतर मात्र हे आर्टिकल डिजिटल स्‍पेस वरून काढून टाकण्यात आले होते.

हेही वाचलं का ? 

Back to top button