Amitabh Bachchan: 'बुलेटप्रूफ असलं तरी सोडणार नाही...', बच्चन पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Amitabh Bachchan Death Threat: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Amitabh Bachchan Death Threat
Amitabh Bachchan Death ThreatPudhari
Published on: 
Updated on: 

Amitabh Bachchan Death Threat: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गँगस्टर गोल्डी ढिल्लोंच्या नावाने सोशल मीडियावर एक धमकीची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी अटक केलेल्या दोन तरुणांचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोघांना अटक केली आहे. हे दोघे आपले साथीदार असल्याचा दावा गोल्डी ढिल्लोंच्या नावाने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे कोणताही कट उधळला गेलेला नाही, असा इशाराही पोस्टमध्ये देण्यात आला आहे. तसेच मुंबईत आणखी २०० साथीदार तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Amitabh Bachchan Death Threat
Amitabh Bachchan Death ThreatPudhari

'कितीही बुलेटप्रूफ केबिन उभारल्या तरी ठार मारणार'

या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना थेट लक्ष्य करण्यात आले आहे. दोघांनी कितीही बुलेटप्रूफ केबिन तयार केल्या तरी त्यांना ठार मारणार, अशी धमकी देण्यात आली आहे. बुलेटप्रूफ केबिनमधूनही त्यांना गोळ्या घालू, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Amitabh Bachchan Death Threat
Koffee With Karan 9: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये समय रैना गर्लफ्रेंडसोबत येणार? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

१९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख

धमकीच्या पोस्टमध्ये १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देण्यात आला आहे. या दंगलींसाठी जबाबदार असलेल्या लोकांना कधीही माफ केले जाणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच शीख समुदायाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला टार्गेट केलं जाणार आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही देशात असली तरी तिला सोडणार नाही, असा इशारा पोस्टमध्ये देण्यात आला आहे.

Amitabh Bachchan Death Threat
Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप; ११ दिवसांत केला नवा विक्रम, किती कोटी कमावले?

पोस्टची अधिकृत पुष्टी नाही

दरम्यान, गोल्डी ढिल्लोंच्या नावाने सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. ही पोस्ट नेमकी कोणी केली, तिच्यामागे कोण आहे आणि अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना धोका आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या धमकीच्या पोस्टमधील दाव्यांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

सोशल मीडियावरील या धमकीमुळे बच्चन कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाते का याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.