Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप; ११ दिवसांत केला नवा विक्रम, किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Collection Day 11: ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Ramayana Box Office Collection
Ramayana Box Office CollectionPudhari
Published on: 
Updated on: 

Ramayana Box Office Collection Day 11: रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरुच आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट १,४०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

‘रामायण’ने भारतात ११ व्या दिवशी ७५ कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील चित्रपटाचे कलेक्शन ७६०.६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, दहाव्या दिवशी चित्रपटाने ७२.९० कोटी रुपये कमावले होते. त्या तुलनेत ११ व्या दिवशी कमाईत २.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

चित्रपटाने पहिल्या आठ दिवसांत भारतात ५६४.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत आणखी १९६ कोटी रुपये कमावले. त्यामुळे अवघ्या ११ दिवसांत भारतातील निव्वळ कमाईचा आकडा ७६०.६० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

जगभरातील कमाई १,४०० कोटींच्या जवळ

‘रामायण’ने भारतासह परदेशातही चांगली कमाई केली आहे. ११ दिवसांनंतर चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १,३८४.५० कोटी रुपये झाले आहे. यामध्ये भारतातील ९०९ कोटी रुपये आणि परदेशातील ४७५.५० कोटी रुपयांच्या कमाईचा समावेश आहे.

चित्रपटाच्या एकूण कमाईत परदेशातील बाजारपेठांचा वाटा ३४.३ टक्के आहे. भारतात या चित्रपटाचे आतापर्यंत २ लाख ६० हजार ५६७ शो दाखवण्यात आले आहेत. भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शनही आता १,००० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Ramayana Box Office Collection
Koffee With Karan 9: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये समय रैना गर्लफ्रेंडसोबत येणार? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई

‘रामायण’च्या हिंदी आवृत्तीला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाने आतापर्यंत ५८२.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर कन्नड आणि तेलुगू भाषेतील आवृत्त्यांनीही चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाचे भाषेनुसार भारतातील कलेक्शन पुढीलप्रमाणे आहे.

  • हिंदी – ५८२.२५ कोटी रुपये

  • कन्नड – ६३.१० कोटी रुपये

  • तेलुगू – ४९.४० कोटी रुपये

  • तमिळ – ३४.४० कोटी रुपये

  • मल्याळम – ३१.४५ कोटी रुपये

Ramayana Box Office Collection
Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 5,950 रुपयांनी स्वस्त

काय आहे ‘रामायण’ चित्रपटाची कथा?

‘रामायण’ हा चित्रपट महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणावर आधारित आहे. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामांची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीरामांनी रावणाविरुद्ध केलेला संघर्ष आणि सीतेला परत मिळवण्यासाठी केलेला प्रवास चित्रपटात पाहायला मिळतो.

नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सचाही सहभाग आहे.

चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. तर दुसरा भाग दिवाळी २०२८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.