Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची मध्यरात्री पोस्ट; ‘जलसा’वर गोळीबार करण्याचा कट उधळला, दोन शूटर अटकेत

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Firing Plot: अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचल्याचा संशय असून, दिल्ली पोलिसांनी दोन शूटरना अटक केली आहे.
Amitabh Bachchan Jalsa Bungalow
Amitabh Bachchan Jalsa Bungalow Pudhari
Published on: 
Updated on: 

Amitabh Bachchan Jalsa Bungalow Firing Plot: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळीच कारवाई करत या कटात सहभागी असलेल्या दोन संशयित शूटरना अटक केली आहे. यातील एकाला मुंबईतून, तर दुसऱ्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेदरम्यान अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ दोन शब्द लिहिले होते, ‘बच गए’. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट जलसा बंगल्यावरील गोळीबाराच्या कटाच्या पार्श्वभूमीवर केली आहे का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित काही शूटर अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केल्यामुळे हा कट उधळण्यात यश आले.

Amitabh Bachchan Jalsa Bungalow
Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप; ११ दिवसांत केला नवा विक्रम, किती कोटी कमावले?

दोन शूटर अटकेत

दिल्ली पोलिसांनी पंजाबमधील दोन शूटर विकास ठाकूर उर्फ विक्की आणि दीपक सिंह उर्फ दीप यांना अटक केली आहे. दीपकला मुंबईतून, तर विकास ठाकूरला दिल्लीतून पकडण्यात आले. दीपक सिंह हा पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी आहे, तर विकास ठाकूर जालंधरचा आहे. विकासची चौकशी केल्यानंतर पोलिसांना मुंबईत असलेल्या दीपकची माहिती मिळाली.

Amitabh Bachchan Jalsa Bungalow
Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 5,950 रुपयांनी स्वस्त

तपास यंत्रणांना संशय आहे की, दीपकला एका मोठ्या सुपरस्टारच्या घराबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कामासाठी त्याने तयारीही केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली.

दरम्यान, जलसा बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट उधळल्याच्या वृत्तामुळे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्या ‘बच गए’ या दोन शब्दांच्या पोस्टचा नेमका अर्थ काय, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.