विकी कौशल म्हणतो, प्लीज, पुढच्या चित्रपटात मला घे! | पुढारी

विकी कौशल म्हणतो, प्लीज, पुढच्या चित्रपटात मला घे!

पुढारी ऑनलाईन

विकी कौशल सध्या इंदूरमध्ये सारा अली खानसोबत त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान, वेळ काढून विकीने नुकतीच नेटफ्लिक्सवरील आनंद एल. राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ हा चित्रपट पाहिला. अक्षयकुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा हा चित्रपट विकीला एवढा भावला की, त्याने त्यावर एक नोट लिहून सोशल मीडियात शेअर केली.

विकीने लिहिले आहे की, किती गोड चित्रपट आहे. मजा वाटली पाहताना. सारा, किती अवघड भूमिका होती; पण तू अद्भूतरीत्या साकारलीस. धनुष तू एकदम जिनियस आहेस. अक्षयने धक्काच दिला आहे. आनंद सर, कृपया मला तुमच्या पुढच्या चित्रपटात घ्या!

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Back to top button