मीनल शाह हिच्या एक्स बॉयफ्रेंडची मागणी; ‘तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत पाहिजेत’ | पुढारी

मीनल शाह हिच्या एक्स बॉयफ्रेंडची मागणी; 'तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत पाहिजेत'

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात मीनल शाह शेवटपर्यंत टिकून राहिली. पण, बिग बॉसची प्रबळ दावेदार असतानाही या शोची ट्रॉफी तिच्या पदरी पडली नाही. विशाल निकमने मात्र शो जिंकत या शोचा विजेता झाला. या घरातील सर्वात स्ट्रॉन्ग स्पर्धक म्हणून मीनल शाहची ओळख झाली. पण, तिने प्रत्येक टास्क ज्या पध्दतीने खेळला, अनेक आव्हानांचा सामना केला, ते कौतुकचं म्हणावे लागेल. तिच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. कधीकीळी तिच्या बॉयफ्रेंडनेही तिची साथ सोडली. इतकेच नाही तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यावर खर्च केलेल्या पैशांची मागणीही तिच्याकडे केली.

मीनल लहान असतानाचं तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. मीनल आणि तिच्या भावंडांचा सांभाळ आईनेच केला. आईच्या माहेरची परिस्थिती बेताची होती. मीनलच्या आईने घरातील दागिने विकून मुलांचा सांभाळ केला.

मीनलच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा आला. तो तिला आवडत होता. जवळपास एक वर्षभर एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. या सर्व किस्सा तिने रोडीज शोमध्ये सांगितला होता. त्याने तिला बरीच मदत केली होती. ब्रेकअप झालं तेव्हा तिची परीक्षा सुरू होती. ती रात्री खूप रडले.

इतकचं नाही तर तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यावर खर्च केलेले पैसे परत दे अशी कटू मागणी केली. त्यामुळे तिने मनाशी पक्क ठरवलं होतं की, यापुढे कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. त्यादिवशी तिने ठरवलं होतं की, कुणीही इतक्या सहजपणे मला दुखवू शकत नाही. मला स्ट्रॉन्ग रहायचं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meenal Shah (@meenalshahofficial)

Back to top button