जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन

देशात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झालेली दिसत आहे. अशातच आता अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीलाही करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. जॉन अब्राहमने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

बॉलीवूडमधील डॅशिंग ॲक्शन हिरो जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया यांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यांना लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉन अब्राहमने स्वतः कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. जॉनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, तो तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता, तो व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह होता. यानंतर स्वत: जॉन आणि त्याची पत्नी प्रिया देखील कोविड पॉझिटिव्ह आले.

त्याचबरोबर एकता कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे की, ‘सर्व खबरदारी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.

संसर्ग झाल्याचे समजताच जॉन आणि त्याच्या पत्नीने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. जॉनने सर्व लोकांना कोरोनाबाबत पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. जॉनला संसर्ग झाल्याची बातमी पसरताच त्याचे चाहते त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, चाहते त्याला सतत त्याच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत आणि त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी संदेश देखील देत आहेत.

त्याची लक्षणे सौम्य आहेत ही दिलासादायक बाब आहे. काही वेळापूर्वी जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉनने तिहेरी भूमिका साकारली होती. काही दिवसांतच त्याचा आणखी एक अटॅक हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्या बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील चित्रपटगृहं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच चित्रपटांची प्रदर्शन पुढे ढकलण्यात आली आहे. पण मागच्या काही दिवसांपासून चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कलाकारांना मात्र करोनाची लागण झाल्याचं चित्र आहे. ज्यात आता जॉन अब्राहमच्या नावाचीही भर पडली आहे.

कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जवळपास प्रत्येक शहरात कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. बॉलीवूड स्टार्सही त्याला सातत्याने बळी पडत आहेत. अलीकडेच नोरा फतेही, करीना कपूर, मृणाल ठाकूर यांसारख्या अनेक स्टार्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. नवीन वर्ष नवीन आव्हाने घेऊन येत आहे. कोविड महामारीला तोंड देण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. कोविड 19 चा धोका पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. मुंबईसह जवळपास प्रत्येक शहरात कोविडची प्रकरणे वाढत असल्याचे चित्र आहे.

Back to top button