मुलांनी ‘बाबा आई आली’ ओरडताच रितेश देशमुख ला बसला धक्का व्हिडिओ व्हायरल

रितेश देशमुख
रितेश देशमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : रितेश देशमुख आणि जेनेलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते नेहमी वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आजही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत जेनेलिया ड्रायव्हिंग करत घरी येत आहे. पण एवढ्यात जेनेलियाचा अपघात होतो. व ती एका गाडीला उडवते. या दरम्यान खिडकीतून रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुलं पाहत असतात. हे पाहून दोन्ही मुल बाबा आई आली असं सांगतात. हे ऐकून रितेश देशमुख धास्तावून जातो.

हा व्हिडिओ मजेशीर आहे. रितेश जेनेलियाच्या ड्रायव्हिंगची खिल्ली उडवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. फेसबुकवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. अमृता खानविलकर, शरद केळकर, मयुरी देशमुख, सुनिल शेट्टी यांनी हसरे इमोजी लिहीत कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटीझम्सनी हा व्हिडिओ शेअर करत कमेंट केल्या आहेत. तर हस्याचाही पाऊस पडत आहे.

जेनेलिया व रितेश यांची दोन्ही मुल या व्हिडिओत आहेत. यात त्यांची मुल लाजत असलेली दिसत आहेत. यावरही सोशल मीडियावर कमेंट येत आहेत. याअगोदरही रितेशने असे व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात रितेश जेनेलियाला मदत करत असलेला दिसतो. तर कधी जेनेलियाचा मार खात असलेला दिसतो. या दोघांचे व्हिडिओ नेहमीच मजेशीर असतात.

जेनेलिया व रितेशला दोन मुल आहेत. जेनेलिया डिसुझा व रितेश देशमुख यांची जोडी बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहायला प्रचंड आवडतं. रितेश एक उत्तम अभिनेता तर आहेचं, तसाचं तो एक उत्तम पतीदेखील आहे. त्याच्यामुळे कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये याची तो पुरेपूर काळजी घेत असतो. मग ती त्याची पत्नी जेनेलिया असुदे किंवा त्याची मुलं.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

कळसूबाई डोंगररांगेतील निसर्गरम्य त्रिंगलवाडी किल्ल्याची सैर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news