अकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या | पुढारी

अकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावात शेतकरी जोडप्याने आत्महत्या  केली. आदिवासी समाजातील असलेल्या या शेतकरी जोडप्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

ही घटना आज (ता.१८) उघडकीस आली. पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली होती. शिवाय कर्जाच्या आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा 

मृतक पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय 35) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (वय 30) यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी शेतात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी केली.

शिवाय कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली होती. सतत आर्थिक विवंचनेत सापडल्याने मानसिकरित्या खचल्याने दोघांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

अधिक वाचा 

ही घटना उघडकीस येताच त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र प्रकृती ढासळत असल्याने त्यांना अकोला रेफर करण्यात आले.

अकोला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यात दोघांचाही वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button