

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tinder या ऑनलाईन डेटिंग अॅपबद्दल आपण ऐकलचं असेल. ऑनलाईन डेटिंगमध्ये Tinder हे सर्वांत प्रसिद्ध अॅप आहे. Tinder वर राईट स्वाईप करून आपली डेट शोधता येते. तसेच आता Tinder वर राईट स्वाईप करून Netflix वरही झळकता येणार आहे. पण ही संधी फक्त सिंगल असलेल्यांनाच मिळणार आहे.
Netflix वर In Real Love हा रिअॅली शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. Monozygotic ही कंपनी या शोची निर्मिती करत आहे. यापूर्वी या कंपनीने Indian Matchmaking, Love is Blind, and Too Hot to Handle हे शो बनवले आहेत.
In Real Love या शोसाठी Tinder हे पार्टनर आहे. Tinder राईट स्वाईप करून या शोमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म भरता येणार आहे. Potential Match मध्ये या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कार्ड असेल. अर्थात Neflixच्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं Tinder प्रोफाईल आकर्षक असलं पाहिजे यात काही शंका नाही.
Tinder आणि Match Group चे भारतातील प्रमुख तरु कपूर यांनी ही माहिती दिली. "हा शो पूर्णपणे वेगळा आहे. यातील कास्टिंगपासून सर्व काही नव्या प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे. Tinderवर सध्या जे सिंगल आहे, त्यांना या शोत सहभागी होण्याची संधी आहे. एकूणच Netflixसोबत पार्टनरशिप करताना आम्हाला मोठा आनंद झालेला आहे."
Netflixच्या International Originalsच्या संचालक तनया बामी यांनी हा शो पूर्णपणे 'देशी' असेल असं म्हटलं आहे. कोणताही रिअॅलिटी सेरिज प्रेक्षकांना आवडण्यासाठी ती अस्सल असावी लागते. Tinderच्या माध्यमातून आम्हाला योग्य कास्टिंग मिळेल, त्यांच्या माध्यमातून आम्हाला डेटिंगमधील रोजचे गोंधळ, गमती, प्रश्नही समजणार आहेत.