रत्नागिरी पाऊस : जिल्ह्याला पाण्याचा वेढा, ठिकठिकाणी वाहतूक ठप्प | पुढारी

रत्नागिरी पाऊस : जिल्ह्याला पाण्याचा वेढा, ठिकठिकाणी वाहतूक ठप्प

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार सकाळ ते रविवार सकाळ या २४ तासांत 101 च्या सरासरीने तब्बल एकूण 912 मिमी पाऊस पडला. शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.

ग्रामीण भागातील नद्यांना पूर आल्याने तर शहरी भागात गटारे तुंबल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. जोर ओसरल्यावर सखल भागातील साचलेले पाणी कमी झाले. मात्र, तोपर्यंत ठिकठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

अधिक वाचा

पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे स्वामी स्वरुपानंद मंदिराकडे जाणार्‍या मार्गावर पाणी साचले होते.

सतत पडणार्‍या पावसामुळे नदीला पूर आल्याने शेतीही पाण्याखाली गेली. फुणगूस येथे शास्त्री नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

संपूर्ण खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीत पाणी शिरल्याने शेतीची कामेही खोळंबली. शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपं शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलीत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते.

अधिक वाचा 

काजळी नदीला पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील टेंभेपूल भागातील सखल भागात पाणी शिरले. टेंभेपूल येथील समाजमंदिर पाण्यात अर्धे बुडाले होते.

गोळप मानेवाडा येथेही जमिनीचा काही भाग धसला. येथील बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पावसाचा जोर ओसरल्यावर पूरजन्य भागातील पाणी कमी झाले.

बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. भागातील भात शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.

कोकणाला पुढील 2 दिवस ‘रेड अलर्ट’

गेले सहा दिवस जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यावासियांची दैना उडाली.

पुढील २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसाचा जोर असाच राहिल्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याला दोन दिवस ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मागील 24 तासातील पाऊस

तालुका मिमी आतापर्यंत

मंडणगड 100.70 1895.60

दापोली 100.80 1438.60

खेड 87.40 2055.80

चिपळूण 85.50 1988.10

गुहागर 54.30 1563.60

संगमेश्‍वर 95.90 1792.40

रत्नागिरी 189.30 2140.20

लांजा 105.70 177520

राजापूर 93.30 1629.60

एकूण 912.90 16279.10

PHOTOS : मुंबईची पावसाने केली दैणा

Back to top button