Prajakta Gaikwad : प्राजक्ताने उचलली ४२ किलो वजनाची खंडा तलवार | पुढारी

Prajakta Gaikwad : प्राजक्ताने उचलली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील राणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ( Prajakta Gaikwad ) हिने साकारली आहे. सध्या प्राजक्ताने येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत ४२ किलोची खंडा तलवार उंचल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकतेच प्राजक्ताने ( Prajakta Gaikwad ) येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात जेजुरी येथील खंडोबांचे दर्शन घेतले आहे. यावेळी प्राजक्ताने खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली आहे. यावेळी तिने सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्यांची उधळण देखील केली आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो तिने स्वत: आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यावेळी प्राजक्ताने पिंक आणि काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यातील खास म्हणजे, तिने चक्क ४२ किलो वजनाची खंडा तलवार उंचलली आहे. हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोला तिने ‘सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी कॅप्शन दिली आहे.

यात एकाने तिचे भरभरून कौतुक करत ‘खरंच हे करायला प्रामाणिक भक्ती लागते, ताई तुमच्या धाडसाला तोड नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ‘मराठमोळी वाघिण’, ‘जिजाबाईंची लेक’ असे लिहिले आहे. तर तिसऱ्या एकाने ‘हर हर महादेव, मराठी मातीतली खरी कलाकार, येळकोट येळकोट जय मल्हार राणी सरकार’. ‘खूपच छान ताई’. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. यासोबत चाहत्यांनी हार्ट आणि प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे.

प्राजक्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजीसोबत ‘नांदा सौख्यभरे’, ‘संत तुकाराम’ या मालिकेत काम केले आहे. यासिवाय ती ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले होतं.

हेही वाचलंत का? 

Back to top button