धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार  - पुढारी

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार 

हतनूर ; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात वाहनाच्‍या धडकेत तरुणाचा मृत्‍यू झाला.कडूबा शेकू सोनवणे (वय ३५ रा .शिवराई ) असे त्‍यांचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील शिवराई फाटयाजवळील धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर शिवारातील श्री गणेश नर्सरीजवळ आज (दि २७) पहाटे ही दुर्घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवराई येथील लक्ष्मण नागरे यांनी कन्नड पोलीस ठाण्यात कडुबा सोनवणे हे रस्त्याच्या कडेला मृत्यावस्थेच असल्याची माहिती दिली.कन्नड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, हतनूर पोलीस चौकीचे बीट जमादार सतीश खोसरे, पो हे कॉ. कैलास करवंदे, पो हे कॉ. संजय आटोळे, पोलीस पाटील प्रकाश पवार, पोलीस मित्र संतोष ढोले, शिवराईचे सरपंच संतोष मुठठे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

कन्नड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. कडुबा सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button