सलग दुसर्‍या आठवड्यात भाजीपाला तेजीत | पुढारी

सलग दुसर्‍या आठवड्यात भाजीपाला तेजीत

शिमला मिरची, भेंडी, गवार, शंभरी पार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात दुसर्‍या आठवड्यातही भाजीपाल्याची आवक वाढली नसल्याने भाज्यांचे दर वाढले होते. बाजारात बहुतांश भाज्यांचा पाव किलोचा दर 20 ते 30 रुपये असा होता.

शिमला मिरची, भेंडी, गवार, घेवडा, शेवगा यांचा दराने शंभरी पार केली आहे. दरम्यान, मटार, टोमॅटो आणि काकडीचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांची आवक काहीशी वाढली आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची पायाभूत सुविधा विकासावर ३५,६२८ कोटींची गुंतवणूक

भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने तसेच, मार्गशीर्ष महिन्यातील उपवासामुळे बाजारात तसेच भाजी मंडईत ग्राहक संख्या रोडावल्याचे चित्र होते.

रविवारी (दि. 19) मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारमध्ये 2 हजार 491 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवडयाच्या तुलनेत यामध्ये थोडीशी वाढ होती; मात्र दुसरीकडे पालेभाज्यांची आवक घसरल्याचे चित्र आहे.या रविवारी 38 हजार 290 गड्डया भाज्यांची आवक झाली.

Royal Enfield क्लासिक ३५० च्या ब्रेकमध्ये समस्या, २६,३०० युनिट्स मागे घेतल्या

पिंपरी बाजारात मटार, फलॉवर, काकडीची मोठी आवक झाली आहे. तर, रोजच्या वापरातील कांदा व बटाट्याचीही आवक झाली आहे. त्यामुळे कांदा-बटाट्याचे दर काहीसे कमी झाले आहेत.

गेल्या आठवडयापूर्वी 60 किलोने मिळणार्‍या मटारची विक्री 40 किलो दराने विक्रेते करत होते. टोमॅटो आणि काकडीच्या दरातही किलोमागे दहा रुपयांनी घसरण झाली आहे; मात्र, इतर भाज्यांची आवक स्थिर असल्याने त्याचे भाव अद्याप तेजीत होते.

मुश्रीफांनी किरकिर फार सहन केली : डॉ. श्रीपाल सबनीस

बाजारातून वांग्याची आवक रोडावल्याचे चित्र आहे. वांग्याचे दर वाढल्याने ग्राहकांची त्याकडे पाठ फिरवली असल्याचे विके्रेते सांगत आहेत.

कोथिंबीर, कांदापात स्वस्त बाजारात कोथिंबीरच्या 19 हजार गड्डया तर, कांदापातीच्या 9 हजार 520 गड्डया विक्रीसाठी आल्या होत्या. त्यामुळे कांदा व कोथिंबीरीच्या दरात घसरण झाली होती.

बीडमधील माकडांचा ‘धिंगाणा’ जगभरातील माध्‍यमात

कोथिंबीरचा दर प्रतिगड्डी 10 रुपये होता; तर कांदापातीची 15 रुपायाला विक्री केली जात होती. त्याचप्रमाणे इतरही शेपू, पालक, मूळा, मेथीच्या दरातही घसरण झाली होती.

काकडीचा वेगळा वाण बाजारात बाजारात देशी काकडीप्रमाणेच काही विक्रेत्यांनी वेगळ्या वाणाची काकडी विक्रीसाठी आणली होती. त्याला इंग्लिश काकडी असे विक्रेते संबोधतात.

Back to top button