Cold Wave : दिल्लीसह उत्तर भारताचा पारा आणखी घसरला; प्रदूषणातही वाढ

Cold Wave : दिल्लीसह उत्तर भारताचा पारा आणखी घसरला; प्रदूषणातही वाढ

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा पारा आणखी घसरला असून दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी तापमान 3.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दिल्लीला लागून असलेल्या राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. (Cold Wave)  कडाक्याच्या थंडीबरोबरच प्रदूषणाची समस्या वाढल्याने नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 Cold Wave: बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारताच्या तापमानावर

काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पहाडी भागात होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारताच्या तापमानावर झाला आहे. राजस्थानमध्ये चुरू येथे उणे 0.5 अंश, सीकर येथे उणे 0.1 तर करोली आणि फतेहपुर येथे उणे 1.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांना श्वास कोंडणाऱ्या हवेचा सामना करावा लागत आहे. दिल्ली आणि राजस्थानशिवाय उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये थंडीची लाट (North India Cold Wave)  आली आहे. गेल्या 15 डिसेंबरपासून थंडीत अचानक वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे एक्यूआई 290 पर्यंत वाढला आहे. हा निर्देशांक गंभीर हवेच्या श्रेणीत येतो. येत्या 22 तारखेपर्यंत एक्यूआई गंभीर श्रेणीत राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news