बोगस भरती प्रकरण भोवलं; 14 ग्रामसेवक, दोन कृषी विस्तार अधिकारी निलंबित | पुढारी

बोगस भरती प्रकरण भोवलं; 14 ग्रामसेवक, दोन कृषी विस्तार अधिकारी निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 20 ग्रापंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात 22 अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील 16 जणांना निलंबित करण्यात आले असून,  संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Cutting
बोगस भरती प्रकरणी दै. पढारीने आवाज उठवला होता

पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी 20 ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याच्या तक्रारींची  चौकशी करण्यासाठी तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक असताना अधिकार्‍यांनी नियम बाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

कोरोनाची लस घेतलेल्या 90% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका

विभागीय कार्यालयात सुनावणी

पुणे जिल्हा परिषदेतील पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानुसार कर्मचार्‍यांच्या यादीसह अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे महानगरपालिकेसह ग्रामविकास आणि पंचायत राज विभागालाही सादर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेने प्रशासकीय कारवाई केली असून, कायद्यानुसार विभागीय चौकशीची सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.

विरोधकांची अनुपस्थिती अन् भाजपवर विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

चाैकशी टाळण्यासाठी दबाव

चौकशी केली जाऊ नये, यासाठी प्रचंड दबाव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र 60 हजारांपेक्षा जास्त पानांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. पिसोळी  शेवाळवाडी, म्हाळुंगे या ग्रामपंचायतींमध्ये नोकर भरतीमध्ये चुकीची कामे झाली नसल्याचे आयुष प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा

खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची निव्वळ भुरळ

नवीन पिढीला मंदिरांमागचे विज्ञान समजले पाहिजे : देगलूरकर

खंडणीसाठी अपहरण करणार्‍या सहा जणांना बेड्या; पोलिसाचाही समावेश

 

Back to top button