मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्रांचा आधार | पुढारी

मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्रांचा आधार

अर्जाच्या तपासणीवेळी झाले उघड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या नवीन मतदार नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद लाभला. अभियानात गठ्ठेचे-गठ्ठे अर्ज भरून मतदार नोंदणी कार्यालाकडे जमा करण्यात आले. मात्र, अनेक अर्जांसोबतचे कागदपत्रे बोगस असल्याचे तपासणीत उघड होत आहे, असे अर्ज बाद केली जात आहेत.

जिल्हा निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या 35 दिवसांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात राबविले.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची पायाभूत सुविधा विकासावर ३५,६२८ कोटींची गुंतवणूक

महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्ष, विद्यमान नगरसेवक व इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरून ते संबंधित मतदार नोंदणी कार्यालयांकडे जमा केले.

अभियानात चिंचवड विधानसभा मतदार संघात 29 हजार 693, पिंपरी मतदारसंघात 18 हजार 19, भोसरी मतदारसंघात 29 हजार 538 आणि भोर मतदारसंघातील ताथवडे गावातील 500 अर्ज प्राप्त झाले.

Royal Enfield क्लासिक ३५० च्या ब्रेकमध्ये समस्या, २६,३०० युनिट्स मागे घेतल्या

या अर्जाची छाननी करण्याचे काम संबंधित मतदार संघाच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. काही अर्जासाठी जोडलेले कागदपत्रे बोगस असल्याचे दिसत आहे.

वीजेचे बिल, गॅॅस नोंदणी पुस्तिका, रेशन कार्ड, बँक पासबुक, मिळकतकराचे बिले बनावट असल्याचे दिसत आहे. तसेच, पत्ताचा एकच पुरावा तब्बल 20 ते 25 अर्जांना जोडण्यात आला आहे.त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी अक्षरश: चक्रावून गेले आहेत.

मुश्रीफांनी किरकिर फार सहन केली : डॉ. श्रीपाल सबनीस

कागदपत्रांबाबत शंका असल्यास त्या अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावून घेण्यात येत आहे. योग्य कागदपत्र सादर केल्यास त्यांची नोंदणी केली जात आहे.

अन्यथा अर्ज बाद केला जात आहे. अर्ज बाद होण्याचे प्रमाण 30 ते 35 टक्के इतके आहे. त्यामुळे सुमारे 20 हजार अर्ज बाद होण्याची
शक्यता आहे.

बीडमधील माकडांचा ‘धिंगाणा’ जगभरातील माध्‍यमात

सुनावणी पूर्ण करून 25 डिसेंबरपर्यंत त्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक कार्यालयाने सर्व मतदार नोंदणी कार्यालयास दिले आहेत.

त्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त मनुष्यबळ तसेच, संगणक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्याने नोंद झालेल्या मतदारांची यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

 

 

Back to top button