Stock Market : शेअर बाजार पुन्हा कोसळला; ‘या’शेअर्समध्ये शॉर्ट/ मिड टर्म साठी गुंतवणुकीची संधी | पुढारी

Stock Market : शेअर बाजार पुन्हा कोसळला; 'या'शेअर्समध्ये शॉर्ट/ मिड टर्म साठी गुंतवणुकीची संधी

जगभरात थैमान घालणाऱ्या ओमायक्रॉनच्या भितीचा दणका आज पुन्हा एकदा शेअर बाजाराला बसल्याचे दिसून आले. ओमायक्रॉन रूग्णांची वाढती संख्या आणि पुन्हा एकदा घोंगावत असलेले लॉकडाऊनचे संकट यामुळे आजच्या सत्रात शेअर्सची जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले.

शेअर बाजाराच्या आजच्या सत्राची सुरुवात निगेटीव्ह झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत निफ्टी 500 अंकानी तर बँक निफ्टी 1500 अंकांपर्यंत कोसळला होता. या पडझडीने काही मिनिटांत अंदाजे सहा लाख कोटी रूपयांचा चुराडा झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या तीन सत्रातील आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरल्याचे दिसून आले.

आजच्या दिवसांत सिप्ला, ग्लँड, हिंदुस्तान युनिलिव्हर, ऑरोफार्मा, डॉ रेड्डीजचे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यत वर गेले होते. तर बंधन बँक, इंडिगो, बीपीसीएल, डीएलएफ, टाटा स्टील सारख्या कंपन्यांचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.

‘या’ शेअर्समध्ये शॉर्ट अथवा मिड टर्मसाठी गुंतवणूक केल्यास मिळू शकेल चांगला परतावा

आजच्या पडझडीमुळे HDFC, RELIANCE, ADANIENT, COLPAL, CAMS, CDSL MRF, SRF, GODREJCONSUMER, TATA CONSUMER, MGL यासारखे दिग्गज शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. जर गुंतवणुकदारांनी तज्ञांचा सल्ला घेवून, या शेअर्समध्ये काही काळासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परतावा मिळू शकतो.

हेही वाचा

Back to top button