Rajeshwari Kharat photo: काळ्या चिमणीची राख सापडली, तू कोठे आहेस... | पुढारी

Rajeshwari Kharat photo: काळ्या चिमणीची राख सापडली, तू कोठे आहेस...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी मनोरंजन विश्वात भलेही ‘फॅंड्री’फेम राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat photo)  सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या आणखी एका तिच्या हटके फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना घायाळ केले आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून राजेश्वरी चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे.  राजेश्वरी आगामी ‘पुणे टू गोवा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याच दरम्यान आता तिने आपल्या इंन्स्टाग्रावर काही हॉट फोटो शेअर (Rajeshwari Kharat photo) केले आहेत. या फोटोतील राजेश्वरीच्या नजरेने चाहते घायाळ झाले आहेत.

इंन्स्टाग्रावर शेअर केलेल्या फोटोत राजेश्वरीने काळ्या रंगाचा शार्ट टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅट परिधान केली आहे. राजेश्वरीने एका भितींच्या शेजारी उभे राहून पोझ देताना या फोटोत दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Saturday baby..’ लिहिली आहे. याशिवाय तिचा लाल रंगाच्या नऊवारी साडीतील एक व्हिडिओ शेअर झाला आहे. या व्हिडिओत मराठमोळ्या वेशभूषेने तिचे सौदर्य अधिकच खुलले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एकाने ‘काळ्या चिमणीची राख सापडली, तू कोठे आहेस’. तर दुसऱ्याने ‘लवकर लग्न कर.’ असे लिहिले आहे. याशिवाय आणखी एकाने ‘माझी झोप उडवली’ असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी या फोटोंवर प्रेमाचा आणि हास्याचा ईमोजी शेअर केला आहे.

याआधीही राजेश्वरीने आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फँड्री, आयटमगिरी या मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘फँड्री’ या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही परंतु, तिचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button