राखी सावंत हिचा पती रितेश नाही? खऱ्या पत्नीसोबतचा फोटो व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क
राखी सावंत आतापर्यंत ज्या रितेशला तिचा पती सांगत आलीय. तो तिचा खरा पती नसल्याचे म्हटलं जात आहे. रितेश आधीपासूनचं विवाहित असल्याचे काही जणांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. तर काही जणांनी रितेशची खरी पत्नी आणि त्यांच्या मुलाचे फोटो ट्विटरवर ट्विट केले आहेत. यावर रितेशचं म्हणणं आहे की, त्यांनी जे केलं ते करिअर आणि पैशांसाठी केलं. बिग बॉस मेकर्सनी त्यांना असं करण्यास सांगितलं होतं. आता याचा पर्दाफाश झाल्याचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
रितेशचे फाेटाे व्हायरल
रितेश तिचा पती नाही. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रितेशचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एक महिला आणि एक मुलगाही दिसतो. तिने साल २०१८ मध्ये लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव रितेश आहे. परंतु, कुणीचं तिच्या पतीचा चेहरा किंवा फोटो पाहिला नव्हता. जेव्हा सावंतने रितेशसोबत 'बिग बॉस १५' मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली तेव्हा सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
होस्ट सलमान खानलादेखील विश्वास बसला नव्हता की, रितेश हा तिचा पती आहे. तेव्हा सलमानने तिला विचारलं होतं की, रितेश खरंच तिचा पती आहे? की पैसे देऊन पती होण्याचा ॲक्टिंग करायला सांगितलंय. तेव्हा सावंतने शपथ खाऊन सांगितलं होतं की, रितेश तिचा पती आहे. पण, आता जे फोटो समोर आले आहेत. ते सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहेत. Twitter@imrealriteshh नावाने एक ट्विटर हँडल आहे. यामध्ये रितेशचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये त्याच्या लग्नाचे फोटो आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये एक महिला मुलासोबत दिसतेय.
हेही वाचलं का?
- अली अकबर : रिझवी यांच्या पाठोपाठ मल्ल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांची मुस्लिम धर्म त्याग करण्याची घोषणा
- पुणे विद्यापीठ : ११९ वा पदवी प्रदान सोहळा; विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने गोंधळ
- EPFO : तुमच्या PF अकाउंटमधून भरु शकता LIC प्रीमियम, जाणून घ्या काय आहे सुविधा
- Tomato Price : टोमॅटोची 80 रुपये किलोंवर उडी, बळीराजापेक्षा व्यापार्यांनाच भाववाढीचा फायदा

