अक्षया देवधर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
अक्षया देवधर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

हे तर काहीच नाय! : अक्षया देवधर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Published on

पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्राला विनोदी पात्र साकारण्याची परंपरा खूप मोठी आहे.  आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात जसे की चौकात, नाक्यावर, कट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात आणि ह्या गोष्टी अगदी मसाला लावून रंगवून सांगितल्या जातात.

अशाच काही सेलेब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अश्या गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठी वर रंगणार आहे. अगदी शाहरुखपासून शरद केळकर पर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वेपर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत.

अश्याच अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार. झी मराठी वर ज्यामध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड आणि त्याच सोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोबतच अनेक सरप्राइझेस ह्या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील.

तेव्हा  मंडळी पाहायला "हे तर काहीच नाय!" १० डिसेंबर पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वा.  झी मराठी वर.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news