बिग बॉस marathi 3 : सोनाली विकासला म्हणते, किचनची जबबादारी राहिली.. - पुढारी

बिग बॉस marathi 3 : सोनाली विकासला म्हणते, किचनची जबबादारी राहिली..

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ( बिग बॉस marathi 3 ) आज रंगणार आहे कॅप्टन्सी टास्क. पण घरामध्ये विकास, विशाल, सोनाली, मीनल आणि गायत्रीमध्ये कॅप्टन्सी टास्कसंदर्भात एक चर्चा सुरू आहे. घरामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे टास्क आणि त्यानंतर घरातील कार्य कोण करणार? हा प्रश्न आहे. विकास त्याचबद्दल यांच्याशी बोलताना दिसणार आहे.

विकासचे म्हणणे आहे, मी कदाचित एकमेव माणूस आहे ज्याने प्रत्येक विभागामध्ये काम केले आहे. यावर गायत्री आणि मीनल म्हणाली आम्ही पण. विकासच्या विधानावर सोनाली म्हणाली, तेच की आता किचनची जबाबदारी राहिलं आहे. नाही प्रॉपर नीट केलेलं नाहीस ना, नुसतीस ढवळाढवळी केली आहे. जशी करतोस टास्कमध्ये.

यानंतर मीनल म्हणाली की, बाथरूमसोडून सगळं केलं कारण, ते तू सोडलं नाहीस. जेव्हा तू नव्हतास तेव्हा केलं आहे.

विकासचे म्हणणे आहे, मुद्दे मांडण्याची वेळ येईल तेव्हा मला हा पॉइंट बोलता येईल ना. सोनाली म्हणाली, मी आता किचन घेणार नाहीये. विशालचे म्हणणे आहे, मी कॅप्टन असलो तरी काम करणार आहे.

बिग बॉस marathi 3 मध्ये बघूया कॅप्टन कोण होणार ? आणि कोणत्या सदस्याला कोणते कार्य ( duties) मिळणार. पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button