Bigg Boss मराठी ३ : कोणाचं कारणं घरच्यांना भेटण्यासाठी पटणार... | पुढारी

Bigg Boss मराठी ३ : कोणाचं कारणं घरच्यांना भेटण्यासाठी पटणार...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss मराठी ३ ) घरामध्ये आज सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य भेटणार आहेत. जवळपास ६५ दिवसांहून अधिक कालावधीनंतर आपल्या परिवारातील सदस्यांना स्पर्धक भेटल्यानंतर ते नक्कीच भावूक होणार आहेत.

Bigg Boss मराठी ३ मधील नुकताच समोर आलेल्या प्रोमोमधून आपण पाहिलं की, विकासला भेटण्यासाठी त्याची बायको घरामध्ये आली. तर जयला त्याच्या आई- वडिलांनी भेट दिली. पण या भेटीसाठी देखील सदस्यांना बिग बॉस एक टास्क देणार आहे असे दिसते आहे. ज्यामध्ये सदस्यांना किती वेळ द्यावा याचा निर्णय घरातील सदस्य ठरविणार आहेत. जास्तीत- जास्त वेळ आपल्याला का देण्यात यावा? याचे कारण घरातील इतर सदस्यांना सांगायचे आहे. आणि याचवरून मीरा विकासला मनवण्याचा प्रयत्न करते आहे.

यावेळी मीरा विकासला सांगते की, खरंच मला खूप गरज आहे कारण माझे घरचे लोक माझ्याशी बोलत सुध्दा नाहीत. माझ्याशी तर या कारणामुळे बोलायला तरी लागतील. मला असं वाटतं. हे माझं सगळयात genuine कारणं आहे. पाच वर्ष झाली ते बोलत नाहीत, भेटायचे सोड. सोनाली त्यावर म्हणाली, मला असं वाटतं इतक जर sensible कारणं असेल तर विकास आपण विचार करायला हवा.

यावर मीरा म्हणाली, एकच गोष्ट फक्त अॅडजेस्ट कर विकास. एका मिनिटाने नाही फरक पडणार. तू त्यांच्यासोबत राहतोस तरी… विकास म्हणाला, काही गोष्ट आहेत मी इथे नाही बोलू शकतं. मीराचे म्हणणे आहे, माझं पण तेच आहे, इथे नाही बोलू शकतं, ज्या त्यांच्याशी मला बोलायच्या आहेत. या कारणामुळे बोलायला लागतील माझ्याशी… चर्चा पुढे अशीच सुरू राहिली.

यामुळे बघूया या घरातील सदस्यांनी काय निर्णय घेतला. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button