Bigg Boss Marathi 3 : जय-गायत्री यांच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा - पुढारी

Bigg Boss Marathi 3 : जय-गायत्री यांच्या मैत्रीत पुन्हा एकदा दुरावा

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या (bigg boss मराठी) घरामध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहेत. जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र वा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये दुरावा येत चालला आहे. मागील आठवड्यात विशाल आणि विकास, तसेच गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडले. तसेच विशाल आणि सोनालीमध्येदेखील अबोला तसाच आहे. (bigg boss मराठी) आता कालपासून कुठेतरी जय आणि गायत्रीच्या मैत्रीत देखील फूट पडली आहे, असे दिसून येते आहे. काल जयने गायत्रीला नॉमिनेशनमध्ये देखील टाकले. गायत्रीला जयचे वागणे आणि तर जयला गायत्रीचे बोलणे, वागणे, इकडच्या गोष्टी तिकडे सांगणे हे पटत नाहीये. आणि त्याचबाबतीत तो आज उत्कर्ष आणि मीराशी बोलताना दिसणार आहे.

जय उत्कर्ष आणि मीरासोबत चर्चा करणार आहे. जयचे म्हणणे आहे, आपल्या गोष्टी तिकडे जातात किंवा आपण जी मेहनत करतो, जी investment करतो ती वाया जाते ना ? मीराचं म्हणणं आहे, मागच्या वेळेस देखील तसंचं झालं होतं. जयचे म्हणाला, आपण मग कोणत्या वेगळ्या सदस्यामध्ये इनवेस्ट केलं असंत ना, तीच गोष्ट.

आपल्याला रिजल्ट नंतर चांगला मिळाला असता. विशालमध्ये invest केलं असतं… तो strongly उभा राहिला असता तर.

आपल्याला आज सपोर्टची गरज नाहीये. उभं राहणं… काहीपण असून दे जेव्हा कोणी आपल्यासाठी उभं रहात ना आपली फॅमिली वाटते रे. मीराचे म्हणणे आहे, आपल्याला काही गरज नाहीये.

जय पुढे म्हणाला, आज जर तू आमच्या विरुध्द तिकडे गोष्टी बोलीस. तू आमच्याकडून शिकलेली आहेस, तू तिकडे ४० लोकांसमोर काढते चूक आहे हे. मग तू ते use करतेस as a weapon. उद्या असं होईल तेदेखील तुला नाही सांगणार गोष्ट. ते पण तुला बाजूलाचं ठेवणार. ज्यावेळेस गरज आहे तेव्हा हिला वापरा…”

bigg boss marathi 3

बघूया अजून ही चर्चा किती वाढत गेली. पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठी.

हेही वाचलं का?

Back to top button