bigg boss मराठी 3 : सोनालीची आई आली अन् स्पर्धक झाले भावूक - पुढारी

bigg boss मराठी 3 : सोनालीची आई आली अन् स्पर्धक झाले भावूक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ( bigg boss मराठी 3 ) कालपासून प्रचंड भावूक वातावरण आहे. जिथे वादविवाद, भांडण, कट – कारस्थाने होत होती तिथे आज सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत. कारण देखील तसेच आहे, स्पर्धकांना भेटायला येत आहेत त्यांच्या कुटुंबातील लाडके काही सदस्य. जे त्यांना प्रोत्साहन आणि सल्ले देत आहेत,

bigg boss मराठी 3 घरात आलेले सदस्याच्या कुटुंबिय गोड शब्दांत कानघडणी देखील करत आहेत. घरातील सगळे सदस्य गहिवरून गेले जेव्हा सोनालीची आई घरी येऊन गेली. आज देखील तसंच काहीसं बघायला मिळणार असून घरामध्ये विशालची आई भेटीस येणार आहे.

पण याबरोबर सदस्यांसोबत बिग बॉस काही वेगळाच गेम खेळत आहेत. घरातील सर्व सदस्य कालपासून एक-एक करून फ्रिज होत आहेत आणि मग रिलीज. आज बाथरूममध्ये देखील सदस्यांची गंमत सुरू असताना बिग बॉस यांनी त्यांनाच फ्रिज केले. पहिले उत्कर्ष, मग मीरा आणि जय देखील झाले फ्रिज. विकास त्यांना जेव्हा मदत करायला गेला तेव्हा बिग बॉसने त्याला देखील फ्रिज केले. बघूया अजून कोण- कोण होणार आहेत फ्रिज.

त्यामुळे बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button