चेक बाउन्सप्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात वॉरंट - पुढारी

चेक बाउन्सप्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात वॉरंट

पुढारी ऑनलाईन

मागील काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर असलेली अभिनेत्री अमिषा पटेल चर्चेत आहे. ती पुन्हा एकदा ‘सकीना’च्या आयकॉनिक भूमिकेत दिसणार आहे. २००१ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर ‘गदर’चा रीमेक येत आहे. दरम्यान, अमीषा पटेल आता एका प्रकरणात अडकली आहे. भोपाळच्या एका कोर्टाने तिच्या नावे वॉरंट जारी केला आहे.

कोर्टाने सुनावणीवेळी म्हटलं की, अमीषाला स्वत: कोर्टात उपस्थित राहावं लागेल. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, युटीएफ फिल्म्सने तिच्याविरोधात तक्रार केली होती. तिने चित्रपाटासाठी कंपनीकडून पैसे उधार घेतले होते. पण, पैसे परत करताना जो चेक दिला तो बाउन्स झाला. चेक बाऊन्सचे हे प्रकरण ३२.२५ लाख रुपयांशी संबंधित आहे.

गदरचा रिमेक येणार

दसऱ्याच्या निमित्ताने सनीने पोस्टर शेअर करत लिहिलं होतं- “दोन दशकांनंतर प्रतीक्षा संपली. चित्रपटातील कलाकार तेचं असतील. सनी देओल तारा सिंहच्या भूमिकेत असेल. अमीषा पटेल सकीना असेल. २००१ मध्ये सनीच्या मुलाची ज्याने भूमिका साकारली होती, तो उत्कर्ष शर्मा (दिग्दर्शक अनिल यांचा मुलगा) यावेळीही ‘जीते’च्या भूमिकेत दिसेल.

 

हेही वाचलं का?

Back to top button