bollywood movies in december : '83' ते 'जर्सी' पाहा 'हे ५ चित्रपट - पुढारी

bollywood movies in december : '83' ते 'जर्सी' पाहा 'हे ५ चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क

वर्षातील शेवटचा महिना  सुरु झाला आहे.  डिसेंबरमध्ये अनेक मोठे चित्रपट रिलीज होण्यास सज्ज आहेत. (bollywood movies in december) यामध्ये रणवीर सिंहचा ’83’ ते शाहिद कपूरच्या ‘जर्सी’पर्यंत चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांचा फॅन्स प्रतीक्षा करत होते.आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. पाहुया, कोणत्या दिवशी कोणता चित्रपट रिलीज हाेणार आहे ते. (bollywood movies in december)

तडप

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया स्टारर चित्रपट ‘तडप’ ३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा तेलुगु चित्रपट ‘आरएक्स १००’ चा हिंदी रीमेक आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शक असून हा एक रोमँटिक ॲक्शन ड्रामा आहे. ‘तडप’मधून अहान शेट्टी बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर तारा सुतारिया ग्लॅमरचा तडका लावणार आहे. निर्मिती साजिद नाडियाडवाला यांची आहे.

‘अतरंगी रे’

अक्षय कुमार स्टारर चित्रपट २४ डिसेंबरला रिलीज होईल. आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह धनुष आणि सारा अली खान देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘चंडीगढ करे आशिकी’

भूषण कुमार निर्मित या रोमँटिक चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका फिटनेस फ्रीक (आयुष्मान) विषयी आहे. तो एका झुंबा ट्रेनर (वाणी कपूर) ला भेटतो आणि प्रेमात पडतो. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटामध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळणार, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित भूषण कुमार आणि प्रज्ञा कपूर यांची निर्मिती आहे. हा चित्रपट १० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

‘८३’

८३ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. कपिल देव कॅप्टन असताना भारतीय क्रिकेट टीमने पहिला वर्ल्डकप जिंकला होता. रणवीर सिंह, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी आणि दीपिका पादुकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘जर्सी’

शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ ३१ डिसेंबर रोजी रिलीज होईल. अल्लू अरविंद द्वारा प्रस्तुत, अमन गिल यांची निर्मिती आहे. गौतम तिन्ननुरी यांचे दिग्दर्शन आहे. ‘जर्सी’मध्ये मृणाल ठाकुर, पंकज कपूरदेखील आहेत. जर्सी हा २०१९ मध्ये तेलुगू चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचाच हा हिंदी रीमेक आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

 

Back to top button