दहावी निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता | पुढारी

दहावी निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दहावी ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. दहावी निकालाबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

अधिक वाचा :

”महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ. १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल.” असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदा राज्य शिक्षण विभागानं निकालाच्या गणितासाठी पर्यायी मुल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मुल्यांकन निकषानुसार, वर्ग ९ ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

यंदा कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावी परीक्षा २८ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती.

कोरोनामुळे परीक्षा केली होती रद्द

यंदाची दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या दरम्यान आयोजित केली होती. पण कोरोना संकटामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यंदा दहावी परिक्षेसाठी १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी आणि ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनींचा समावेश होता.

अधिक वाचा :

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले नववीचे वार्षिक परीक्षेचे गुण आणि दहावीचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण यावर आधारित मुल्यांकन करण्यात आले आहे. त्यावर निकाल तयार करण्यात आला आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

दहावीचा निकाल पाहण्यासाठी http://result.mh-ssc.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भूगोल आणि करिअरच्या संधी

 

Back to top button