तुमची मुलगी काय करते? लवकरच नवीन मालिका भेटीला | पुढारी

तुमची मुलगी काय करते? लवकरच नवीन मालिका भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच तुमची मुलगी काय करते? ही नवीन मालिका सुरू होत आहे. नुकतंच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री मधुरा वेलणकर मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तुमची मुलगी काय करते? या मालिकेच्या प्रोमोने उत्सुकता वाढवलीय.

अभिनेता हरीश दुधाडे पोलिस इन्स्पेक्टर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून संवाद मुग्धा गोडबोले तर कथा- पटकथा लेखन चिन्मय मांडलेकर करणार आहे.

लवकरच प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर एक थरारक मालिका बघायला मिळणार आहे. मालिकेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहात राहा, सोनी मराठी!

Back to top button