कश्मीरा शाहने कृष्णा अभिषेकला न सांगता नेलं अन्‌ थेट लग्नचं लाऊन आणलं

bold kashmira shah
bold kashmira shah
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस -१४ ची स्पर्धक अभिनेत्री कश्मीरा शाह आपल्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कश्मीरा शाह कॉमेडियन कृष्‍णा अभिषेकची पत्नी आहे. तिने तिचे अनेक हॉट फोटोशूट इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

कश्मीरा शाहचा बोल्ड अवतार

तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती मोनोकिनी बिकिनीत दिसतेय. काही बिकिनीमध्ये ती बोल्ड आणि सेक्सी बिकिनी फिगर फ़्लॉन्ट करताना दिसतेय. ती डान्स आणि हॉट अदांसाठी प्रसिध्द आहे. ती आपल्या फिटनेसचे पूर्ण लक्ष ठेवते. आपल्या फॅन्सनादेखील फिट राहण्यासाठी मोटिवेट करते.

ती चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील करते. तिचा पहिला चित्रपट मरने भी दो यारों रिलीज झाला होता.

लिव इन- लव्हस्टोरी

शाह कृष्णासोबतच्या पहिल्या डेट विषयी म्हणाली होती-जयपूरच्या जवळ शूटिंग सुरू होते. आम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. यावेळी मी कृष्णाला हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावलं. त्यावेळी आम्ही केवळ मित्र होतो, डिनरच्यावेळी आम्ही एकमेकांना समजून घेतलं. आम्ही रात्रीपासून सकाळी ७ वाजेपर्यंत बोलत बसलो होतो.

जयपूरमध्ये पहिल्या भेटीनंतर आम्ही लव्हर झालो. मुंबई आल्यानंतर त्यांचं रिलेशनशीप सर्वांसमोर आलं. २००७ मध्ये तिने ब्रॅड लिस्टरमॅनला घटस्फोट दिला. सर्वांना वाटलं की, तिचं पहिलं लग्न मोडण्याचं कारण कृष्णा आहे. पण, तसं नव्हतं. तिनं पहिलं लग्न मोडण्यामागे इतर कारणे होती. लिव्ह इन रिलेशननंतर २०१३ मध्ये कश्मीरा-कृष्णाने लग्न केलं.

अन् थेट लग्नचं लावून आणलं …

द कपिल शर्मा शो मध्ये कृष्णाने आपल्या लग्नाविषयीचा मजेशीर किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता, शाह आणि कृष्णा अभिषेक दोघे एकत्र डान्स प्रॅक्टिसला असायचे. काही स्पर्धांमध्ये त्यांनी एकत्र परफॉर्मन्स सादर केले होते. पुढे त्यांचं ट्यूनिंग जमल्यामुळे दोघेही बराच वेळ एकत्र राहू लागले. पुढे ते परदेशात फिरायला जायचा निर्णय घेतला. तिने कृष्णाला परदेशात नेले. तेथे एका फादरनी त्यांना आशीर्वाद दिले. पण, सुरू असलेली लग्नाची विधी कृष्णा अभिषेकच्या लक्षात आली नाही. शेवटी यू गॉट मॅरिड असे फादरनी म्हटल्यानंतर तितकेचं शब्द कृष्णाच्या लक्षात आले. आणि तो आश्चर्याने पाहू लागला. तोपर्यंत कृष्णाचं तिच्यासोबतचं लग्न पार पडलं होतं.

अशा पध्दतीने तिने न सांगता कृष्णाला फिरायला घेऊन जाण्याच्या निमित्ताने थेट लग्नचं लावून आणलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news