Gharkul scam : माजी मंत्री देवकरांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली | पुढारी

Gharkul scam : माजी मंत्री देवकरांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात (Gharkul scam) शिक्षा झालेली आहे. त्यांना निवडणूक लढऊ देऊ नये अशी मागणी करणारी पवन ठाकूर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली होती. दोन सुनावण्यांनंतर न्यायालयाने ठाकूर यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे गुलाबराव देवकरांना दिलासा मिळाला आहे. आता देवकर यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. घरकुल घोटाळ्यातील शिक्षेवर गुलाबराव देवकर यांनी स्थगिती मिळवली होती. (Gharkul scam)

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इतर संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधीच बहुमत मिळवले आहे. जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव सर्वात पुढे आहे
गुलाबराव देवकर यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. याचिकाकर्ता फक्त जळगावचा आहे म्हणून याचिका गृहीत धरता येणार नाही. शिक्षेचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही अशा याचिका गृहीत धरण्यात येऊ नये, असा हा युक्तिवाद होता यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले  दिले. अशामुळे भविष्यात कुणीही उठसुठ याचिका दाखल करू शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. (Gharkul scam)

हे ही वाचा :

Back to top button