बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान | पुढारी

बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान

मुंबई; पुढारी ऑनलाईन

वाढणार बिग बॉस मराठीची शान… जेंव्हा मंचावर येणार “भाईजान”… सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते तो क्षण आता आला आहे… बिग बॉस मराठी सिझन ३ च्या चावडीवर सदस्यांना ‘सरप्राईझ’ मिळणार आहे…कारण बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे…

तेव्हा पाहा या आठवड्याची बिग बॉस मराठीची चावडी… जी रंगणार आहे खुद्द खानच्या हजेरीत.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रोमो मध्ये महेश मांजरेकर यांनी जाहीर केले, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत खानने देखील सांगितले “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” याचसोबत त्याने “ओ भाऊ जरा चावडीवर या” असे देखील जाहीर केले.

बघूया, काय काय धम्माल मस्ती होणार या आठवड्याच्या बिग बॉस मराठीच्या चावडीवर शनिवार – रविवार रात्री ९.३० वा.  कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button