आता टेन्शन संपणार! नोकरी बदलली तर EPF खाते आपोआप होईल ट्रान्सफर | पुढारी

आता टेन्शन संपणार! नोकरी बदलली तर EPF खाते आपोआप होईल ट्रान्सफर

पुढारी ऑनलाईन:  जेव्हा आपण नोकरी बदलतो तेव्हा पन्नास प्रकारची कागदपत्रे आपल्याला जमा करावी लागतात. नेहमी काहीतरी करायचे बाकी राहते, विशेषत: दोन कंपन्यांमधील कागदी व्यवहारांच्या बाबतीत. नोकरी बदलल्यानंतर, अशीच एक मोठी डोकेदुखी म्हणजे आपले ईपीएफ खाते म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF खाते) हस्तांतरित करणे. नोकरी बदल्यानंतर प्रत्येकवेळी नवीन ईपीएफ खाते तयार केले जातात, ज्यांचे हस्तांतरितकरण ही देखील एक मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण लवकरच तुमची या सर्व त्रासातून सुटका होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणारी ईपीएफओ एका एम्पलॉई-फ्रेंडली सिस्टमवर काम करत आहे, जी नोकरी बदल्यानंतर कर्मचार्‍यांच्या सर्व ईपीएफ खात्यांचे विलीनीकरण आणि हस्तांतरण आपोआप करेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी खूप मोठी अडचण दूर होणार आहे.

राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याची अफवा ज्यांच्यासोबत झाली त्याच भाजपमध्ये गेल्या!

नवीन बदल काय असेल?

ईपीएफओने सीडॅकद्वारे केंद्रीकृत एक सक्षम प्रणाली विकसित करण्यास मान्यता दिली आहे. या प्रणाली अंतर्गत, ईपीएफओ ​​सदस्यांची सर्व खाती आपोआप विलीन केली जातील, नोकरी बदलल्यास त्यांना स्वतःहून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.

म्हणजेच, आता आपण नोकरी बदलली आहे, मग आपले ईपीएफ खाते नवीन संस्थेत हस्तांतरित करायचे आहे, असे टेन्शन घ्यायची गरज नाही. या केंद्रीकृत प्रणालीद्वारे, ईपीएफओ सदस्यांची सर्व पीएफ खाती विलीन आणि डी-डुप्लिकेट केली जातील, जेणेकरून सदस्यांना हस्तांतरण प्रक्रियेची चिंता करावी लागणार नाही. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ने २० नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

माझ्या पराभवासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांची रसद : आमदार विक्रम सावंत

आता काय नियम आहेत?

सध्याच्या नियमांनुसार, व्यक्तीने नोकरी बदलल्यास, नवीन संस्थेमध्ये नवीन ईपीएफ खाते उघडले जाते. UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) नंबर तोच राहतो, परंतु संस्था नवीन ईपीएफ खाते उघडते. अशा परिस्थितीत, त्याला जुने ईपीएफ खाते जुन्या संस्थेतून नवीन संस्थेत हस्तांतरित करावे लागते. कारण जुन्या कंपनीमधून त्याच्या पगारातून कापलेला पीएफ त्याच खात्यात जमा झालेला असतो. त्यामुळे पीएफमध्ये जमा केलेली रक्कम त्याच्या नवीन खात्यात ट्रान्सफर करावी लागेल.

Shakti Mills Gang Rape : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : सात वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

हे काम ईपीएफओच्या सदस्य सेवा पोर्टलवर ऑनलाइन करावे लागते. जर सदस्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर त्याच्या आधारशी लिंक असेल, तर ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाते, परंतु जर युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्याला जुन्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्या नवीन कंपनीकडे एक फॉर्म सबमिट करावा लागतो.

Back to top button