

'अजुनही बरसात आहे' या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताहेत. अनेक वर्षांनंतर अचानक भेटलेले हे दोघं आणि मग त्यांची पुन्हा सुरू झालेली प्रेमकहाणी आता लग्नाचं रूप घेणार आहे. अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर रोजी 'अजूनही बरसात आहे' मालिकेत संपन्न होणार आहे.
कॉलेजमध्ये असताना मीरा आणि आदिराज यांची भेट एका प्रसंगात अचानक होते. भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि कालांतराने प्रेमात होतं. पण काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप होतं आणि १० वर्षांनंतर ते पुन्हा भेटतात. पुन्हा भेटल्यावर त्यांच्यात सातत्याने वाद होतात. पण आदिराजचा भाचा मल्हार आणि मीराची बहीण मनस्विनी यांच्या प्रेमकहाणीमुळे आदिराज आणि मीरा यांना एकमेकांशी बोलून त्या दोघांना मदत करणं भाग पडतं.
या सगळ्यांत त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनातलं प्रेम ओठांवर येतं. आदिराज आणि मीरा त्यांचं प्रेम एकमेकांकडे व्यक्तं करतात आणि आता लवकरच ते कायमचे एकमेकांचे होणार आहेत. प्रेक्षकांना ही प्रेमकहाणी आवडते आहे आणि ते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, त्या मीरा आणि आदिराज यांचं लग्न लवकरच पार पडणार आहे.
२४ नोव्हेंबरपासून #Adira यांचा विवाह सप्ताह सुरू होणार असून प्रेक्षकांना मीरा आणि आदिराज यांच्या लग्नसमारंभातले क्षण, अर्थातच मेहंदी, संगीत, हळद हे सगळं अनुभवता येणार आहे. २४ ते ३० नोव्हेंबर मीरा आणि आदिराज यांचा विवाह सप्ताह पहायला मिळणार आहे! सोनी मराठी वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण! पाहा विवाह सप्ताह, सोम.-शनि., रात्री ८.०० वा. सोनी मराठी वाहिनीवर!