कुठं कुठं जायचं हनीमूनला : रसिका सुनील-आदित्यचे व्हिडिओ व्हायरल | पुढारी

कुठं कुठं जायचं हनीमूनला : रसिका सुनील-आदित्यचे व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन :

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील काही दिवसांपूर्वी आदित्य बिलागीसोबत विवाहबंधनात अडकलीय. आता ती हनीमूनला गेल्याचे दिसतेय. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनीमून डेस्टिनेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. ती आदित्यसोबत मालदिवला गेल्याचे या फोटोंवरून समजते.

एका फोटोत ती समुद्रकिनारी पाठमोरी बसलेली दिसते. या फोटोत ती बिकिनीमध्ये दिसतेय. तिने हा फोटो शेअर कॅप्शन लिहिलीय- Let start off with some Maldives pictures ♥️

त्याचबरोबर तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ विमान प्रवासातील आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शन लिहिलीय- If you haven’t, you should, If you have, I understand if you are dying to go back again ♥️ Sharing a glimpse of our travel to the resort in Maldives ❤️ Hope you too, get to experience the beauty of the ocean as we did

याशिवाय लग्न सोहळ्यातील काही खास क्षणांचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर, तिचे वर्कआऊटचे व्हिडिओदेखील इन्स्टाग्रामवर दिसताहेत.

रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडली होती. रसिका लॉस एंजिलिसला पुढंच शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तेथे आदित्य बिलागीशी तिची ओळख जाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांनी लग्न केले.

१ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने तिच्या रिलेशनशीपविषयी जाहिरपणे केले होते.

गोव्यात लग्न

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले होते. दोघांनी गोव्यात लग्न केले. सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर करत तिने ‘१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, अशी कॅप्शन लिहिली होती. त्या दोघांनी १८ ऑक्टोबर रोजी लग्न केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

Back to top button