'रॉयल' हनीमून तेही फक्त ४५ मिनिटात ! लग्नाळूंना विमान कंपनीकडून स्पेशल 'ऑफर' | पुढारी

'रॉयल' हनीमून तेही फक्त ४५ मिनिटात ! लग्नाळूंना विमान कंपनीकडून स्पेशल 'ऑफर'

वाॅशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन

हनीमून… लग्‍नाळूंच्‍या गालावर खळी पाडणारा शब्‍द ! हनीमूनला कोठे जाणार? या प्रश्‍नानेच नवदाम्‍पत्‍याच्‍या नवजीवनाची सुरुवात होते. ‘लोणावळा, खंडाळा, कोल्‍हापूरचा पन्‍हाळा, बेंगलोर, गोवा नि काश्‍मिरला कुठं कुठं जायाचं हनिमूनला? ही लावणी आपल्‍याकडील नवदाम्‍पत्‍यांनाही आजही ‘गुदगुल्‍या’ करते, हा माहितीचा पसारा मांडण्‍याचा कारण की, आता मागील सात वर्षांपासून हवाई हनिमूनची (  Honeymoon ) सुविधा देणार्‍या अमेरिकेच्‍या एका विमान कंपनीने नवदाम्‍पत्‍यांसाठी खास ऑफर दिली आहे.

हनिमूनच्‍या आठवणी नेहमीच नवदाम्‍पत्‍याच्‍या स्‍मरणात राहाव्‍यात यासाठी ही ऑफर देण्‍यात आल्‍याचे लव क्‍लाउड जेट चार्टर विमान कंपनीने म्‍हटलं आहे. लग्‍नानंतर हनीमूनला जाण्‍याचा मागील काही वर्षांपासून एक ट्रेंड झाला आहे. देशातील महत्‍वाच्‍या पर्यटनस्‍थळांबरोबर विदेशातही हनीमूनजाला जाण्‍या विचार केला जात होता. यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात.

नवदाम्‍पत्‍यांना हवाई हनीमूनचा (  Honeymoon in Airplane ) आनंद देण्‍यासाठी अमेरिकेतील लव क्‍लाउड जेट चार्टर विमान कंपनीने खास ऑफर दिली आहे. अमेरिकेत याला ‘रॉयल हनीमून’ म्‍हणूनही ओळखले जाते.

Honeymoon :  नवदाम्‍पत्‍यांसाठी ४५ मिनिटांची हवाई सफर

लव क्‍लाउड जेट चार्टर विमान कंपनीच्‍या खास ऑफरमध्‍ये नवदाम्‍पत्‍याला ४५ मिनिटांची हवाई सफर असेल. यासाठी ९९५ डॉलर म्‍हणजे आपल्‍या चलनात सुमारे ७३ हजार रुपये मोजावे लागतील. ४५ मिनिटांचा हा हवाई प्रवास असेल. नवदाम्‍पत्‍य हा प्रवास दीड तासापर्यंत वाढवूही शकते. मात्र यासाठी त्‍यांना एक लाख रुपये मोजावे लागतील.

लव क्‍लाउड जेट चार्टर विमान कंपनी गेली ७ वर्ष हवाई हनिमूनची सेवा देत आहे. नवदाम्‍पत्‍यांसह अनेक जेष्‍ठ दाम्‍पत्‍यांनीही या सेवेचा आनंद घेतला आहे. नातेवाईकांसह रात्रीचे हवाई भोजन आणि विमानातील लग्‍नासाठीही कंपनी ही विमानसेवा देते.

हेही वाचलं का?

Back to top button